• Thu. Nov 28th, 2024

    अजबच! रंगाने नव्हे, ‘या’ गावात खेळतात दगडांची होळी; रक्तबंबाळ होईस्तोवर होते दगडफेक अन् नंतर…

    अजबच! रंगाने नव्हे, ‘या’ गावात खेळतात दगडांची होळी; रक्तबंबाळ होईस्तोवर होते दगडफेक अन् नंतर…

    यवतमाळ : होळी हा रंगांचा सण. रंगांमधील हानिकारक केमिकलमुळे फुलांची होळी खेळण्याची परंपराही पाळली जाऊ लागली. यवतमाळ जिल्ह्याच्या गदाजी बोरीत दगडांची होळी खेळली जाते. या गावात होळीनिमित्त एकमेकांवर दगडफेक केली जाते. करोनाचा कालावधी वगळता ही परंपरा गावकरी जोपासत आहेत. यानिमित्त तीन दिवस गावात यात्रा भरते. दूरवरचे लोक ही यात्रा अनुभवण्यासाठी गर्दी करतात.
    नागपूर विद्यापीठ ठरले सुवर्णपदकाचे मानकरी, कायाकिंग स्पर्धेत मुलींच्या संघाची नेत्रदीपक कामगिरी
    मारेगाव तालुक्यात मुख्य मार्गापासून एक किमीवर गदाजी बोरी हे गाव आहे. फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला गावात यात्रा भरते. सुमारे ६० वर्षांपूर्वी गदाजी महाराज वास्तव्यास होते. त्यांच्याप्रती श्रद्धा दाखविण्यासाठी होळीच्या दिवशी रंग खेळण्याऐवजी दगडफेक करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. या परंपरेनुसार धुलिवंदनाच्या दिवशी गावकरी मडक्यात धुनी करून अंत्ययात्रेप्रमाणे गावात फिरवितात. यानंतर भाविक आंघोळ करून महाराजांच्या मंदिराजवळील उंच टेकडीवर जातात. टेकडीवरून काही लोक दगडफेक सुरू करतात. कुणी जखमी होईपर्यंत हे चक्र सुरू असते. रक्तस्राव झालेल्या व्यक्तीला पुन्हा मंदिरात नेऊन त्याच्या शरीरावर विभूती लावली जाते. काही वेळानंतर ही व्यक्ती शुद्धीवर येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यात्रेचा परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री संत गदाजी महाराज देवस्थान कमिटी बोरी (बु)ने केले आहे.

    यात्रेचे नियोजन


    -आज, सोमवारी सकाळी ८ वाजता गावातून मिरवणूक निघणार.

    -सकाळी ११ वाजता गोटमार होळी खेळली जाईल.

    – दुपारी २ वाजता दहिहंडी

    – दुपारी ४ वाजता गदाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed