• Fri. Nov 29th, 2024
    थंडीचा जोर वाढला, तापमान १३ अंशावर; वाढत्या थंडीमुळे एकाचा बळी

    Akola News : अकोल्यात थंडीचा कडाका वाढला आहे. शहरातील किमान तापमान १३ अंशावर पोहोचलं आहे. अशात वाढत्या थंडीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    Lipi

    प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यात थंडीचा पारा दिवसेंदिवस खाली जात असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात थंडी वाढत असल्याचे बुधवारी अकोल्यात जाणवले. किमान तापमान १३.६, तर कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अकोला जिल्ह्यात ३ डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहिलं, असे हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तीन दिवसांपासून पारा घसरत असल्याचं चित्र आहे. यंदा सरासरी ६९३.७ मिमी पाऊस अपेक्षित असताना, ८११.२ मिमी पाऊस झाला. त्यामुळे थंडीचा जोर वाढत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

    Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोध्दार, भाविकांना दर्शन घेता येणार? मंदिर समितीने दिले अपडेट

    वाढत्या थंडीमुळे अकोल्यात एक बळी

    वाढत्या थंडीचा फटका रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे. वाढत्या थंडीमुळे अकोला जिल्ह्यातील माना, या गावात एका व्यक्तीचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. माना येथील प्रवासी निवाऱ्यात एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. प्रकाश मार्कंड असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. मृत व्यक्तीचं वय वर्ष ६० वर्ष असून त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुले असं कुटुंब आहे.
    मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मिळणार अर्थ आणि गृहखाते?, घडामोडींना वेग
    प्रकाश मार्कंड हे मूळचे धुळे जळगाव येथील असून ते काही वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यातील माना या गावामध्ये वास्तव्यास होते. त्यांची शेती माना येथे असल्यामुळे ते धुळे जळगाव ते माना अशी ये – जा करत राहायचे. त्यांची बहीण वयोवृद्ध असून त्या माना इथे राहायच्या. त्यांच्याच घरुन बुधवारी धुळे येथून रेल्वेने प्रवास करून सकाळच्या सुमारास प्रकाश मार्कंड माना इथे पोहोचले. ते माना इथे त्यांच्या बहिणीच्या घरी गेले.
    मुंबईत मृतावस्थेत आढळली एअर इंडियाची पायलट, धक्कादायक बाब समोर; २५ वर्षीय तरुणीसोबत काय घडलं?

    थंडीचा जोर वाढला, तापमान १३ अंशावर; वाढत्या थंडीमुळे एकाचा बळी

    ६० वर्षीय प्रकाश हे माना पोलीस स्टेशन परिसरात फिरत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने आश्रय घेण्यासाठी त्यांनी प्रवासी निवाऱ्याचा सहारा घेतला. मात्र थंडीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. या संदर्भात माना पोलीस अधिक तपास करत आहेत.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed