Rajesh Kshirsagar Criticizes Uddhav Thackeray: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
मी एकटाच केडरमधील कार्यकर्ता, त्यामुळे मला मंत्रिपद मिळेल
राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाला आहे. मात्र यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच तर सुरूच आहे मात्र यामुळे शपथविधी रखडला आहे. या संदर्भात बोलताना, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काॅमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला. त्यांनी सुरू केलेला समाजातील प्रत्येक घटकासाठीच्या योजना यामुळे महायुतीचा विजय झाला. एकनाथ शिंदे यांनी मोदी शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल सांगितल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग आणखी सुखकर झाला आहे. दिल्ली वरून निर्णय आला की लगेच सत्ता स्थापन होईल, असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील धक्क्यानंतर कर्नाटकात भूकंप; मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात, डीकेंसह सिद्धरामय्या दिल्लीत, बदल होणार निश्चित
तसेच शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मंत्रिपद मिळतील अशी खात्री असून शिवसेना स्थापन झाल्यापासून चा मी कार्यकर्ता आहे. बाकीचे निवडणून आलेले आमदार आता आलेली आहेत.गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यात विविध विरोधाला समोरे जात आम्ही कसे योग्य आहोत हे दाखवून देण्यात यशस्वी झालो आहे. जिल्ह्यात मी एकटाच केडरमधील कार्यकर्ता काम करत आहे. त्यामुळे मला मंत्रिपद मिळेल असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.तसेच जिल्ह्यात शिवसेनेचे १ खासदार ३ आमदार आणि २ पाठिंबा असलेले आमदार आहेत. ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद फॉर्मुला आहे. माझ ही ३ टर्म आमदार आहे. यामुळे पालकमंत्री पद आम्हाला मिळाव यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि ते आमच्याकडेच राहील, असे ही सांगितले आहे.
तुम्ही लोकांना कशाला खुळ्यात काढत आहात
दरम्यान त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली असून निवडणूक होण्यापूर्वीच जिल्ह्यात १० पैकी १० जागा महायुतीच्या येणार हे मी आधी पासून म्हणत होतो. लाडक्या बहिणीचा प्रतिसाद आम्हाला मोठा होता यासोबतच लोकसभेनंतर हिंदू देखील एकवटले आणि त्यांनी दाखवून दिले हिंदू एकत्र आल्यावर काय करू शकतो.असे क्षीरसागर म्हणाले आहेत. तसेच पराभवानंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीन वर होत असलेल्या आरोपांना देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले असून महाविकास आघाडी ला आता सुप्रीम कोर्टाने देखील फटकारलेल आहे.
तुम्ही निवडून आला की ईव्हीएम चांगल आणि हरला की ईव्हीएम चुकीच आरोप करता. तुम्ही लोकांना कशाला खुळ्यात काढत आहात. तुम्ही निवडणूक हरलेला आहात यामुळेच अशा बेछूट आरोप करत आहात. अडीच वर्ष तुम्ही ऑनलाईन सत्ता चालवली लोकांचे हाल झाले. कोरोना नंतर देखील तुम्ही किती वेळा मंत्रालयात गेला? यामुळे लोकांनी बिनकामाच्या लोकांना निवडून द्यायचं नाही अस ठरवल होत. लोकसभेत यांनी फेक नरेटीव सेट केला. यावेळी हिंदू बेसावध होते. मात्र यावेळी ‘एक है तो सेफ है’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या नारा दिल्याने हिंदू एकजूट झाला आणि असा निर्णय आला आहे असे आमदार क्षीरसागर म्हणाले आहेत.