• Mon. Nov 11th, 2024
    रस्त्यावर बंद पडलेला ट्रक, अंदाज न आल्यानं भरधाव बाईकची धडक; भीषण अपघातात बाप-लेकाचा अंत

    पंकज गाडेकर, वाशीम: संभाजीनगर नागपूर महामार्गावर किन्हीराजा गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येत असलेल्या दुचाकीची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील बाप, लेक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल राञी उशीरा घडली. जुना छत्रपती संभाजीनगर नागपूर महामार्गावर किन्हीराजा येथील शिवाजी शाळेजवळ ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये नवलचंद धर्माजी वाघमारे (वय ५५) आणि आशीष नवलचंद वाघमारे (वय ३३) हे दोघेही जागीच ठार झाले असून ते वर्धा जिल्ह्यातील आहेत. तर दादाराव निकम हे गंभीर जखमी झाले आहेत.किन्हीराजा येथील शिवाजी शाळेजवळ एमएच ०४ एफयु ९९८३ या ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्यावर उभा होता. तर एमएच २० बीई २३४४ या मोटारसायकलने तीनजण संभाजीनगरवरुन वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कानगावकडे निघाले होते. काल रात्री १२ वाजता किन्हीराजा येथील शाळेजवळ बंद पडलेला ट्रक हा एकाच जागेवर उभा आहे की चालू आहे, याचा अंदाज दुचाकी चालकाला न आल्याने मोटरसायकल उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात मोटार सायकलवरील नवलचंद धर्माजी वाघमारे आणि आशीष नवलचंद वाघमारे हे दोघेही बाप आणि मुलगा जागीच ठार झाले. तर याच मोरसायकलवरील तिसरा व्यक्ती दादाराव सखाराम निकम (वय २६, रा. संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचीही तब्येत चिंताजनक आहे.
    दिंडोरीत महायुतीला टक्कर! आघाडीची जुळवाजुळव यशस्वी ठरणार? भाजपचा गड आघाडी भेदणार?

    राञी १२ वाजता अपघात होताच जऊळका पोलीस स्टेशनचे कर्मचारी व किन्हीराजा प्रा. आरोग्य केंद्रातील रुग्नवाहीकेत चालक व इतर बरेच नागरिक अपघातस्थळी जमा झाले. अपघातग्रस्तांना तातडीने वाशीम येथील रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर जखमीवर वाशीम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नादुरूस्त वाहने ही रस्त्यावर उभी करु नये आणि अपघातास निमंत्रण देऊ नये, असं आवाहन वारंवार ट्रक चालकांना केलं जातं. परंतू नादुरूस्त ट्रक रस्त्यावर उभे राहतात. या प्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed