• Mon. Nov 25th, 2024
    हिंदी-मराठी सिने अभिनेत्याला तिकिट देण्याची चाचपणी, ठाकरेंविरोधात शिंदेंची फिल्मी टक्कर

    मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईची जागा भाजप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दोन सेलिब्रिटींशी चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे.

    पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अभिनेत्यांपैकी एक म्हणजे प्रख्यात बॉलिवूड स्टार गोविंदा आहेत, त्यांनी याआधीही संसदेची पायरी चढली आहे. तर दुसरा कलाकार हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख चेहरा आहे. मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

    ठाकरेंचा उमेदवार कोण?

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांचे पिता अर्थात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत.
    उद्धव ठाकरेंना धक्का, माजी आमदाराने साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेतून थेट लोकसभेचं तिकीट?
    सुरुवातीला सीट टिकवण्यासाठी आग्रही असलेले कीर्तिकर समोरच्या पक्षातून लेकाला तिकीट जाहीर होताच काहीसे बॅकफूटवर गेले. मुलासोबत संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेकडील जागेवर लढण्यास भाजप उत्सुक होता. स्थानिक आमदार किंवा सेलिब्रिटी उमेदवाराला उभे केले होते.
    शिवतारेंनी युतीधर्म पाळला नाही, तर मावळमध्ये उद्रेक; अजितदादांच्या आमदाराचा शिंदेंना थेट इशारा

    कोणाचे किती बळ?

    दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीतील प्रवेश आणि जागावाटपाची चर्चा सुरु असल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उत्तर पश्चिमची जागा मिळण्याची शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दोन आमदार शिवसेनेचे (ठाकरे गट) आणि तीन भाजपचे आहेत. तर नुकतेच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत रवींद्र वायकर यांच्या प्रवेशामुळे त्यांचा आकडा एक झाला आहे.

    खरी औरंगजेबी वृत्ती उद्धव ठाकरेंमध्येच; संजय राऊतांच्या मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    दरम्यान, काँग्रेसकडून संजय निरुपमही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. काँग्रेसला ही जागा न मिळाल्यास मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्यसाठी लढावे लागेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *