• Sat. Mar 7th, 2026
    भाजपने आणलेली एक योजना दाखवा, मी चुपचाप खाली बसेन; प्रणिती शिंदेंचे भाजपला आव्हान

    सोलापूर: सोलापूर लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे गावागावात जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी देत भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी आणि यत्नाळ गावात जाऊन प्रणिती शिंदे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन खासदारांनी सोलापूरच्या विकासासाठी काय केलं, असा सवाल उपस्थित केला. विद्यमान खासदारांनी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी काय केलं, असा सवाल उपस्थित केला. मागील दहा वर्षांपासून सोलापूरला भाजपचा खासदार आहे. एक योजना आणलेली दाखवा, मी चुपचाप खाली बसेन, असे ओपन चॅलेंज प्रणिती शिंदे भाजपला करत आहेत.
    सातारा लोकसभेची जागा लढवण्याची पक्षाने संधी द्यावी, नरेंद्र पाटलांची भाजपकडे मागणी
    मागील दहा वर्षांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार आहे. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात शरद बनसोडे भाजपचे खासदार होते तर २०१९ ते २०२४ या काळात डॉ जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी भाजपचे खासदार होते. दहा वर्षांत या दोन खासदारांनी सोलापूरसाठी काय विकास केला हे जनतेला माहितीच नाही. यंदाच्या निवडणुकीत तर भाजपला उमेदवार सापडत नाही, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केली आहे.

    जंगी स्वागतानंतर सभा गाजवली, पण प्रीतम मुंडेंवर बोलताना पंकजांचा कंठ दाटला

    काँग्रेसच्या विद्यमान आमदार आणि लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी गाठी करत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावात जंगी स्वागत करण्यात आले. प्रणिती शिंदे या देखील स्वागत पाहून भावुक झाल्या होत्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed