• Sat. Sep 21st, 2024
ज्या व्यक्तीमुळे आपण मोठे झालो…; पुतण्याचा काकांवर निशाणा, इंदापुरात रोहित पवार कडाडले

पुणे (बारामती) : ”आता दादा कुठे आहेत? कोणाबरोबर आहेत? अरे वा…जुन्या गोष्टी सहज विसरून जाता…तुम्ही कोणाबद्दल टीका करत होताे…कोणाच्या विरोधात टीका करत होताे… आता तुम्ही विसरले. ज्या व्यक्तीने आपल्याला राजकारणात आणलं…ज्या व्यक्तीमुळे आपण मोठे झालो…ज्या व्यक्तीमुळे देशात पवार कुटुंबाला नाव मिळालं. त्या व्यक्तीला सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी सोडत असाल तर तुम्ही भाजपाच्या विरोधात गेलेले नक्की विसरून जाल”, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.इंदापुरात आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पाडला. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेसने नेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. ”भाजप नेते चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन म्हणाले होते की, त्यांना राजकीय दृष्ट्या पवार साहेबांना संपवायचे आहे, हरवायचे आहे. जे आपले आहेत त्यांची चूक आहे, की नाही..हे मला सांगता येणार नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मात्र, एक गोष्ट नक्की आहे की, आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर ते भाजपचे लोक आहेत”, असंही रोहित पवार म्हणाले.
राज ठाकरे सोबत आल्यास यूपी, बिहारमध्ये नुकसान होण्याची भीती; सावध भाजपकडून महत्त्वाचा निर्णय

याआधी येथे सभा झाली होती असं मला समजलं. मात्र, सभेमध्ये आवाज नव्हता..बरेच लोक आले होते. पण कशासाठी यायचं हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे कोणासाठी यायचं आहे. उद्याच्या काळात कोणाला मतदान करायचे आहे. हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे म्हणून ते इथे आले आहेत. या सभेला लोक येऊ नये म्हणून, अनेक लोकांना फोन आले. या तालुक्यातील काही गावांमध्ये जेवण दिले जाते, असा आरोप रोहित पवारांनी केला..

इंदापूर तालुक्यातील विकास कामांमधून २० टक्के कमिशन घेतले जात असल्याचे पत्र रोहित पवारांना एका कार्यकर्त्याने दिले. याचाच धागा पकडून पवार म्हणाले की, इंदापूर तालुक्यात ७०० कोटी रुपयांची कामे आली. माझं गणित चुकतंय.. मला जमत गणित जमत नाही.. ७०० कोटीला २० टक्क्याने किती होतात? असं विचारत १४० कोटी रुपये कोणाला मिळाले? असा प्रश्न उपस्थित करून रोहित पवारांनी आमदार भरणेंवर जोरदार हल्ला चढविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed