• Mon. Nov 25th, 2024
    उदयनराजेंना अमित शाहांची भेट मिळत नाही याचं वाईट वाटतं – नरेंद्र पाटील

    नवी मुंबई: आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गावागावात आपण पोहचलो आहे. तसेच ग्रामीण भागासह शहरी भागात आपला चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची जागा लढवण्याची भाजपने आपल्याला संधी द्यावी, असे मत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी तुर्भे येथे व्यक्त केले. ते माथाडी कामगारांचे नेते स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी भवन येथे माथाडी कामगारांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.या वेळी आमदार शशिकांत शिंदे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नरेंद्र पाटील म्हणाले की, उदयनराजे हे छत्रपती आहेत. त्यांनी अमित शहा यांच्या भेटीसाठी तीन दिवस दिल्लीत मुक्काम टाकला आहे. त्यांना भेट मिळत नाही याचे वाईट वाटत आहे. एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो. दुसर्‍या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहेत. तरी देखील त्यांना भेट मिळत नाही.
    ज्यांच्या नावातच जय आहे, त्यांचा विजय नक्की, श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्यते पुढे म्हणाले की, सातारा निवडणूक जागेसाठी पेच निर्माण झालेला आहे. त्यांनी सबुरीने घेणे गरजेचे आहे. पक्षाचा निर्णय हाच अंतिम निर्णय असतो. निर्णय कोणाच्या बाजूने लागेल सांगता येत नाही. पण केंद्रात नरेंद्र मोदी यांना ४०५ हून अधिक जागा निवडून आणून देण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार संयुक्तपणे आम्ही काम करू.

    शशिकांत शिंदे म्हणाले की, उद्योगपतींना पायघड्या घातल्या जात आहे. माथाडी कायद्याला झळ बसू लागली आहे. सरकारचा हा कायदा बदलण्याचा प्रयत्न झाला होता. सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. माथाडी कामगार संघटनांना विश्वासात घेऊन कायद्यातील त्रुटी दूर करून त्यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. भविष्यात या कायद्याला नख लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी संघटीत झाले पाहिजे. पर्वी राजकारण्यांवर माथाडी कामगारांचा दबदबा होता, आता राजकारण्यांचा माथाडी कामगारांवर दबदबा निर्माण झाला आहे.

    अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनावर आधारित महापालिकेच्या ६ माध्यमिक शाळांमध्ये प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या पैकी विजेत्या १० विद्यार्थ्यांना या वेळी पारितोषिक वितरण करण्यात आले. माथाडी कामगार वसाहतीतील या शाळा आहेत. नरेंद्र पाटील म्हणाले की, प्रत्येक सरकारचे वारंवार कामगार विरोधी धोरण का आहे हे कळत नाही. ३४ क्रमांकाचे माथाडी बोर्डाचे विधेयक आले त्याला फडणवीस यांनी थांबवले. काही कामगार नेते कारखानदारांकडे खंडणी मागत होते. या क्षेत्रातील गुंड प्रवृत्तीची लोक थांबली नाही, तर कायद्यात बदल करावा लागेल असे सरकारने स्पष्ट केले आहे. कामगार चळवळ मालकांच्या बाजूने जायला लागली आहे.

    शिवतारे बारामतीतून लढणार, अजित पवार पत्रकाराला म्हणाले, तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हीही लढा !

    मालकाने बोर्डात पैसे भरत नाही तरीही आम्ही काही बोलत नाही ही वस्तुस्थिती आहे. माथाडी बोर्डाचे अधिकारी पैसे फेक तमाशा देख अशी परिस्थिती आहे. माथाडी नेते पैसे देऊन पाहिजे तसे आदेश काढत आहेत. निर्णय विकत घेण्याची परंपरा नव्हती. पोलीस माथाडी कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. माथाडी कामगार चळवळ अडचणीत आहे. आता जसा या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले तसा निर्णय काँग्रेसने त्या वेळी घेतला असता तर गमवावा लागला नसता, असे मत व्यक्त केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed