PMC Budget 2026: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला. यामध्ये अर्बन मोबिलिटी सेलची स्थापना करून रस्त्यांसाठी 1505 कोटी रुपयांच्या तरतूदीची घोषणा केली.
अर्थसंकल्पीय आराखड्यात पथ विभागासाठी १५०५ कोटी रुपये भांडवली तर ३६१ कोटी महसुली अशी एकूण १८६६ कोटी रुपये तरतूद सुचवली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही तरतूद पाचशे कोटी रुपयांची अधिक असून ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे.
Pune Traffic: वाहनचालकांनो सावधान! गाडी पळवताच ट्रॅपमध्ये अडकणार; पुण्यात पोलिसांची नवी मोहीम, प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर
शहराच्या विविध भागांत उड्डाणपूल, ग्रेडसेपरटेर, भुयारी मार्ग प्रस्तावित असून, आराखड्यात त्यासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाषाण-सुतारदरा आणि तळजाई-हिंगणे या बोगद्यांच्या कामासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, यंदा या बोगद्यांचा ‘श्री गणेशा’ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेले प्रकल्प
- सनसिटी ते कर्वेनगर पूल (ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन)
- शास्त्रीनगर चौक, बिंदुमाधव ठाकरे चौकातील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल -मार्च २०२७पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
प्रस्तावित महत्त्वाचे प्रकल्प
- मुंढव्यातील महात्मा फुले चौकात ग्रेडसेपरेटर.
- साखर संकुल परिसरात मुंबई-पुणे रस्त्याला जोडणारा उड्डाणपूल.
- चांदणी चौक ते भुगाव दरम्यान नवीन उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर.
- शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा उड्डाणपूल.
- वनाझ ते चांदणी चौकात मेट्रोसमवेत उड्डाणपूल.
- खडकी परिसरातील मुंबई-पुणे रेल्वेलाईनवरील दोन भुयारीमार्ग.
- नगर आणि सोलापूर रस्त्यावर पादचारी भुयारी मार्ग.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
- मुळा-मुठा नदीच्या ४४ किलोमीटर लांबीच्या पट्टयात पुनरुज्जीवनाचे काम वेगाने सुरू आहे.
- संगमवाडी ते बंडगार्डन : ३.७० किलोमीटरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- बंडगार्डन ते मुंढवा : ५.३० किलोमीटर टप्प्याचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२६पर्यंत ते पूर्ण होईल.
स्मार्ट पार्किंग आणि स्ट्रक्चरल ऑडिट
पार्किंगची समस्या भेडसावू नये यासाठी ‘जीआयएस मॅपिंग ऑफ पार्किंग रिझर्व्हेशन’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील सर्व पार्किंग स्लॉट्सची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. तसेच, शहरातील ९९ प्रमुख उड्डाणपूल, सब-वे आणि पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
Mumbai-Pune Expressway: केवळ हलक्या वाहनांना टोलमाफी? पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोंडीत 5 कोटींची वसुली; टोलमाफीचा प्रस्ताव सादर
मेट्रो आणि रेल्वे प्रकल्प
- मेट्रो मार्गावरील अॅमिनिटी स्पेसवर पार्किंग विकसित करण्यासाठी ५ कोटींची तरतूद आहे.
- खडकी रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणामुळे गणेशखिंड आणि जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहतूक सुधारेल.
- पाषाण (पंचवटी) ते कोथरूड आणि तळजाई चौक ते हिंगणे या दरम्यान दोन महत्त्वाचे बोगदे प्रस्तावित आहेत.
नदीकाठ आणि भुयारीमार्ग
- नदीकाठ रस्ता : आरटीओ ते मुंढवा या दरम्यान ३० मीटर रुंदीचा रस्ता वाहतुकीसाठी मोठा दिलासा ठरेल.
- पादचारी भुयारी मार्ग : नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी नवीन भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत.
