मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा २६ मार्चपर्यंत सुटला नाही तर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. त्याच बरोबर कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी दिली असून त्याला आमचा पाठिंबा असल्याचे आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याच भूमिका घेतली होती. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसने त्या सात जागा सांगाव्यात असे आंबंडकर म्हणाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराजांना निवडूण आणण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व पक्षाच्या वतीने केले जातील. मागच्यावेळी जे घडले ते यावेळी घडू नये याची दक्षता घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील तिढा मिटणार नसले तर आमची इंट्री करून काय उपयोग. आम्ही २६ मार्चपर्यंत थांबणार आहोत. आम्ही काँग्रेसला सात जागा कळवल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आणि नाना पटोले यांना पत्र देखील दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सात जागांवर एकमत झाले हे एकाअर्थाने बरे झाले असे ही आंबेडकर म्हणाले.