Baramati Crime News: बारामतीच्या माळेगावमध्ये थरार, कंत्राटदारावर पाच तरुणांचा लाकडी काठी आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी दिलीप धनसिंग जगताप (वय ५२, रा. धुमाळवाडी, ता. बारामती) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जगताप हे शेतकरी व कंत्राटदार असून, हल्लेखोर हे २० ते ३० वयोगटातील तरुण असल्याचे समोर आले आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ‘आमचे पैसे देत नाही’ या कारणावरून आरोपींनी प्रथम शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी काठी व दगडाने डोक्यात गंभीर वार केले. या हल्ल्यात जगताप जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता हा जीवघेणा हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Raj Thackeray : ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ वेबसाईट नेमकी काय आहे? राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात सविस्तर सांगितलं
या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर करत आहेत. तसेच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने युगेंद्र पवारांची ‘मिस यू अजितकाका’ भावनिक पोस्ट
बारामती : गुढीपाडव्याच्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्र न्हाऊन निघाला असताना, नववर्षाच्या स्वागतासोबतच भावनिक क्षणही अनुभवायला मिळत आहेत. राज्यभरात गुढ्या उभारून, शोभायात्रा काढून मराठी बांधव नवचैतन्याने वर्षाची सुरुवात करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर दिवंगत अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यांनी ‘मिस यू अजितकाका’ असे लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून त्यांनी दादांच्या मार्गदर्शनाचे, संस्कारांचे आणि आठवणींचे स्मरण करत नववर्षाची सुरुवात केली आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने युगेंद्र पवार यांनी कुटुंबियांसोबतचे काही खास क्षणही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अजित पवार यांच्या आईंसह सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबतचे क्षण दिसून येतात.
उत्सवाच्या वातावरणातही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आठवणींनी भारावलेले हे क्षण अनेकांना भावूक करणारे ठरत आहेत.
