• Mon. Nov 25th, 2024
    पाणी भरलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीची ऐशीतैशी, उपद्रवीवर कारवाई करण्याची मागणी

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी असतानाही होळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पिशव्या फेकल्या जात आहेत. वाहन चालकांवर या पिशव्या फेकल्या जात असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याची वाहनचालकांची तक्रार आहे.

    शासनाने पर्यावरणाला धोकादायक असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले असून, पालिका प्रशासनाकडून या प्लास्टिक पिशव्यावर कारवाई केली जाते. मात्र, कारवाई पथकाची पाठ फिरताच प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरूच आहे. तर होळीच्या निमित्ताने प्लास्टिक पिशव्याचे फुगे फेकले जाऊ नयेत, असे स्पष्ट आदेश असतानाही होळीला आठवडा असतानाच शहरात पाण्याचे फुगे फेकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
    मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, एसटी आणि टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू
    इमारतीच्या खिडक्यांमधून, गल्ली बोळात लपून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर हे फुगे फेकले जात असल्याची वाहन चालकाची तक्रार आहे. कल्याण-डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे फुगे फेकले जात असून, कल्याण शीळ रोडवरील कोन – भिवंडी हायवेवर मोठ्या प्रमाणावर फुगे फेकले जात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
    दहावीचे दोन पेपर शिल्लक, आरक्षण मिळत नसल्याचं डोक्यात चक्र सुरू, पोराने आयुष्याचा शेवट केला…

    जंगी स्वागतानंतर पंकजांनी एल्गार पुकारला, तिकीट मिळाल्यानंतरची पहिलीच सभा तुफान गाजवली

    कल्याण शीळ रोड हा हायवे असल्याने या रस्त्यावर वाहनांचा वेग प्रचंड असतो. वेगाने जाणाऱ्या वाहनचालकावर फुगे फेकले जात असल्याने यातून अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत. पोलिसांकडून या उपद्रवीवर कारवाई केली जावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed