• Sat. Sep 21st, 2024
ठाकरेंनी आम्हाला MVAमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस NCPने प्रतिसाद दिला नाही- आंबेडकर

मुंबई: मी १२-१२ जागांचा प्रस्ताव दिला होता. उद्धव ठाकरेंनी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही. ही चर्चा ठीक होत नसल्याने उद्धव ठाकरे यांना आपण दोघे लढू असाही प्रस्ताव दिला होता. आम्ही दोघेच लढलो तर ३० ते ३५ जागा आरामात काढू असे ठाकरे यांना बोललो होतो, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
मनोज जरांगे यांनी जालन्यातून लढावं, ७० टक्के मतं घेऊन विरोधी उमेदवाराला हरवतील : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या खास कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी वंचितची जागावाटपासंबंधी भूमिका, महाविकास आघाडीचे निवडणुकीतील भविष्य, भाजपला रोखण्याचा विरोधी पक्षाचा प्लॅन, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली मते मांडली. या संपूर्ण मुलाखतीत त्यांनी वंचितला हवे असलेले मतदारसंघ किंवा जागा सांगण्यास स्पष्ट नकार दिला. आमचे उमेदवार पळविले जातात, त्यामुळे मी माझे पत्ते अजिबात खुले करणार नाही, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितले.जागावाटपावर बोलताना त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेने युतीचा धर्म पाळला नाही. आमच्याशी युतीची घोषणा केली पण जेव्हा वाटपाची वेळ आली तेव्हा आमची बाजू काँग्रेसपुढे मांडली नाही. मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की पहिल्यांदा आपण बसून कोणत्या जागा हव्यात याची चर्चा करू, पण त्यांनी तसे केले नाही. आम्हाला प्रतिसाद दिला नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं आहे.

जगदीश मुळीक नाराज होते, पण… मुरली अण्णांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर काय झालं ते सांगितलं

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीमध्ये जाण्यास उत्सुक आहोत. आम्ही २७ जागा मागितल्या त्यावर वाद झाला. आता आघाडीतील १० जागांपैकी ३ जागांचा तिढा सुटला आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जागांचा वाद होता. त्यानंतर ३ जागांचा वाद सुटला आहे. अजूनही सात जागांवर वाद सुरू आहे. त्यापैकी पाच जागांवर तिन्ही पक्षांचा दावा आहे. त्या जागा आम्ही जिंकू शकतो, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed