• Sat. Sep 21st, 2024
खासदार भावना गवळींची झांसी कायम? संजय राठोडांच्या वक्तव्यानंतर गवळी यांची उमेदवारी निश्चित?

पंकज वाडेकर, वाशिम: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात खासदार भावना गवळी यांची उमेदवारी जवळपास फायनल झाली आहे. सतत पाचवेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचं तिकीट कापून मंत्री संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात रंगू लागली होती. मात्र “मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसून भावना गवळी ह्या आमच्या उमेदवार आहेत” अशी स्पष्टोक्ती मंत्री संजय राठोड यांनी दिल्याने सर्व चर्चांना आता विराम मिळाला आहे. खा. भावना गवळी यांची झांसी कायम राहणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.शिवसेना पक्ष फुटीनंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड हे दोन बडे नेते शिंदे गटात सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन नेत्यात उमेदवारीवरून कलगीतुरा सुरु होता. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात पाचवेळा नेतृत्व करणाऱ्या भावना गवळी सहाव्यांदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांच्याच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोललं जात असले तरी भावना गवळी ह्याच महायुतीच्या उमेदवार असतील, असे संकेत मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.
भाजपवर मोठी नामुष्की, माढ्यात जाहीर केलेली उमेदवारी मागे घेणार, सातारची दादांची जागा भाजपला!

भावना गवळी यांच्यामागे लागलेला इडीचा ससेमिरा आणि मतदार संघात भाजपने केलेल्या सर्वेत संजय राठोड यांच्या नावाला मिळत असलेली पसंती पाहता भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून संजय राठोड यांना उमेदवारी देण्याची भाजपची भूमिका असल्याच बोलल्या जात होतं. मात्र आता दस्तुरखुद्द मंत्री संजय राठोड यांनी ”मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसून मी राज्यात मंत्री आहे. भावना गवळी या खासदार असून त्या आमच्या उमेदवार आहेत आणि महायुतीने दिलेल्या उमेदवाराला आम्ही निवडून आणि असे सांगत संजय राठोड यांनी भावना गवळी यांचा मार्ग मोकळा केला आहे.

भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात होती. मात्र संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांची उमेदवारी सुकर झाली आहे. असं असलं तरी भाजपकडून आणि राष्ट्रवादीकडून अजूनही दावेदारी सुरूच आहे त्यामुळे खा. गवळी यांची झांसी कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed