• Sat. Sep 21st, 2024
Uddhav Thackeray Kolhapur: मी शाहू महाराजांना वचन दिले आहे की…; उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरात केली मोठी घोषणा

कोल्हापूर: ठाकरे कुटुंबीय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या प्रचाराला तर मी येणारच आहे. शिवाय विजयी सभेला ही येणार आहे. शाहू महाराजांच्या विजयासाठी शिवसैनिक संपूर्ण ताकतीने मैदानात उतरेल, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचे घोषित केले आहे. या घोषणेनंतर पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर विमानतळावर उतरताच ठाकरे यांनी सर्वात आधी थेट नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे नवीन राजवाडा येथे पोहोचतात उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज गळाभेट घेऊन विजयाच्या शुभेच्छा दिल्या तसेच महाविकास आघाडी यासाठी आशीर्वाद ही घेतले. यानंतर त्यांच्यात तब्बल तीस मिनिटे लोकसभा निवडणुकी विषयी चर्चा पार पडली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार मालोजीराजे, संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, नितीन बानुगडे पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.

यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी छत्रपती आणि ठाकरे घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून अतूट आहेत. आणि ते आता आणि पुढे नव्या पिढीतही कायम राहतील. महाविकास आघाडी कडून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि शिवसैनिक त्यांना विजय केल्याशिवाय राहणार नाहीत, असे सांगितले.

शाहू महाराजांची उमेदवारी ही मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि मी शाहू महाराजांना वचन दिला आहे की मी त्यांच्या प्रचाराला येणार मात्र विजयाच्या सभेला देखील निश्चित येणार आहे. तसेच मी ही शाहू महाराजांच्याकडे काहीतरी मागितला आहे. त्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांची साथ मिळावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे. शाहू महाराजांना विजयी करण्यात शिवसैनिक संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed