• Mon. Nov 25th, 2024

    शिंगाड्याच्या शेवमुळे १० कर्मचाऱ्यांना विषबाधा, ३ महिलांची प्रकृती गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार

    शिंगाड्याच्या शेवमुळे १० कर्मचाऱ्यांना विषबाधा, ३ महिलांची प्रकृती गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार

    अविनाश महालक्ष्मे
    नागपूर:
    महाशिवरात्रीला उपवासाच्या पदार्थामुळे शंभराहून अधिक जणांना विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता गुरुवारी मिहानमधील एका फार्मा कंपनीतील १० कर्मचाऱ्यांना शिंगाड्याच्या पीठापासून केलेली शेव खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन महिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
    लग्न करून प्रॉपर्टी नावावर कर, प्रेयसीचा तगादा; रोजच्या वादाला कंटाळून प्रियकराचं धक्कादायक कृत्य
    वर्षभरात आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्री यासह श्रावण सोमवार आणि अन्यही अनेक दिवशी उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपवासाला भगर, शिंगाडा पीठ, साबुदाणा, शेंगदाणा यांचे सेवन केले जात असते. यावर्षी मात्र महाशिवरात्रीच्या उपसावाला भगर, शिंगाडा पीठ ज्यांनी खाल्ले त्यांना मळमळ, उलट्या, थरथर असा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे नागपूरसह संपूर्ण जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्णांना मेडिकल, मेयोसह विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. एकट्या मेयो रुग्णालयात त्यावेळी ३४ रुग्ण दाखल होते. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणांहून उपवासाच्या पदार्थांचा साठा जप्त केला, तर दोन कंपन्यांचे उत्पादन थांबिवले होते. अशीच विषबाधेची प्रकरणे राज्याच्या अन्य काही भागातही घडली होती.हे प्रकरण शांत झाले असतानाच गुरुवारी मिहानमधील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दुपारी तेथील कँटीनमध्ये तयार केलेली शिंगाड्याच्या पीठाची शेव खाल्ली आणि त्यानंतर काही तासांनी त्यांना मळमळ, उलट्या, डोकेदुखी असे त्रास सुरू झाले. काहींना प्रचंड थंडी वाजत होती, तर एका महिलेला झटके येत होते. या रुग्णांमध्ये ३ महिला आणि ७ पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कंपनीतर्फे या सर्वांना लगेच सदरमधील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    शिवतारे बारामतीतून लढणार, अजित पवार पत्रकाराला म्हणाले, तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हीही लढा !

    खाद्यपदार्थांतील अफलाटॉक्सीनमुळे अशी विषबाधा होऊ शकते. या सर्व रुग्णांनी शिंगाड्याच्या पीठाच्या शेव खाल्ल्या होत्या. त्यामुळे याच पदार्थातून विषबाधा झाली असण्याची शक्यता आहे. यातील तीन महिलांची प्रकृती जास्त गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर सात जणांवर सामान्य वॉर्डात उपचार सुरू आहे. सध्या सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे या रुग्णांवर उपचार करणारे डॉ. हर्षवर्धन बोरा यांनी मटाला सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed