जळगाव: मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री ते जर गुंडाकडून फुले आणि सन्मान घेत आहेत. गुंड मंत्रालयात येताना रील करत आहेत. यावरुन गुंडाना भीती राहिलेली नाही, असे सिध्द होते. दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जात आहेत. हे बघितल्यावर भाजप महाराष्ट्राला बिहार आणि युपीच्या वाटेवर नेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवानेते आमदार रोहित पवार यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याप्रसंगी केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवानेते आमदार रोहित पवार आदिवासी संस्कृतीचा होळी उत्सवातील भोंगऱ्या बाजार अनुभवण्यासाठी चोपडा तालुक्यातील मालापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी चोपडा येथिल ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी तसेच पदाधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भोंगऱ्या बाजाराच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती देत आदिवासी पेहराव करीत या उत्सवात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.
राज्यात कधी नव्हती तशी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती झाली आहे. मुख्यमंत्री गुंडाकडून सत्कार स्विकारत असल्याने गुंडाची हिंमत वाढली आहे. खुलेआम गोळीबार होत आहेत. आमदारांवर हल्ले होत आहे. त्यामुळे भाजप महाराष्ट्राला युपी व बिहारच्या वाटेवर नेत असल्याचे म्हणावे लागत आहे. काही नेते मोक्का रद्द करीत आहे. या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. लोक भाजपच्या विरोधात आहेत. येथे उमेदवार जाहीर होईल तेव्हा भाजपच्या विरोधात वातावरण आणखी तापेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी माघार घेतली आहे. तेथे लवकरच सक्षम उमेदवार जाहीर करण्यात येईल असेही पवार म्हणाले.
महाराष्ट्र देशातील सर्वात विकसीत राज्य आहे. दिल्लीसमोर हे राज्य कधीही झुकले नाही. पण, इथले नेते दिल्ली वाऱ्या करतात, मागण्या करतात. त्या ऐकल्या जात नाहीत. नेत्यांनी दिल्लीत जाऊन झुकणे किती योग्य आहे? असा प्रश्न जनतेला पडला आहे. याची चिड जनतेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवार निवडून येतीलच, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांनी मागील निवडणुकीत भाजपविरोधात सामान्याच्या बाजूने भाषणे केली. बेरोजगारीचा प्रश्न उचलून धरला. ते जर भाजपसोबत जात असतील आणि दिल्लीसमोर झुकत असतील तर ते लोकांना आणि आम्हालाही आवडणार नसल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यांनी फेरविचार करावा, असे त्यांचेच कार्यकर्ते म्हणत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचेही पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील पाणी टंचाईकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अद्याप टँकर सुरु झालेले नाहीत. सन २०११ च्या लोकसंख्येनुसार पाण्याचे टँकर दिले जाणार आहे, त्यामुळे ते पाणी कसे पुरणार? काही संघटनांची टँकर देण्याची तयारी आहे तर सरकार आचारसंहितेचे कारण सांगत आहे. सरकार कमी पडत असताना संघटनांना देखील थांबविले जात आहे. मग सामान्य लोकांना पाण्याविना मरु द्यावे का? असा संतापही रोहित पवार यांनी व्यक्त केला. राज्यात कृषीमंत्री कुठे आहेत? अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही ते म्हणाले.