• Sat. Sep 21st, 2024

सुशीलकुमार शिंदेंची मोदींवर शेलकी टीका; मुख्यमंत्री असताना बरे होते, पंतप्रधान झाल्यावर…

सुशीलकुमार शिंदेंची मोदींवर शेलकी टीका; मुख्यमंत्री असताना बरे होते, पंतप्रधान झाल्यावर…

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मंगळवारी काँग्रेस पक्षांने संकल्प मेळावा आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून निरंजन टकले आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.भाषण करतान माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भाजपवर शेलकी भाषेत टीका केली. खोटे बोलणारा आणि फसवणारा पंतप्रधान भारतीय जनतेने दहा वर्षे स्वीकारला, मागच्या १० वर्षात सरकारने भुलभुलैया केले आहे, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदेंनी भाजपवर निशाणा साधत नरेंद्र मोदींना टार्गेट केले.

मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा नरेंद्र मोदीही गुजरातचे मुख्यमंत्री होते.मोदी मुख्यमंत्री होते, तोपर्यंत बरे होते. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय शिरल माहिती नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

आम्ही केलेल्या कामाचे उद्घाटन भाजपवाले करत आहेत

मागील दहा वर्षांत भाजप सरकारने जनतेला फक्त भुलभुलैया केले आहे. सोलापूरला डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर जिल्ह्यासाठी वेगळे विद्यापीठ, एनटीपीसी, सोलापूर-पुणे-हैद्राबाद महामार्ग कोणी आणला ? हे सर्व आम्ही आणले आणि भाजपवाले उद्घाटन केले. मोदींची गॅरंटी ही कसली गॅरंटी आहे, माहिती नाही. हा देश गांधी-नेहरू यांचा आहे.

सोलापूर हे शहर हुतात्म्यांचे शहर आहे. देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांना निवडून दिले तर सोलापूरचा डंका दिल्लीत वाजेल. येणाऱ्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना निवडून द्या, असे आवाहनही सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

भाजपने प्रणितीला घेण्याचे बरेच प्रयत्न केले

संकल्प सभेत बोलताना शिंदे यांनी भाजपने प्रणिती शिंदे यांना पक्षात घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र त्या काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक राहिल्या.सोलापूरात काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाला नसला तरी प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मला आणि प्रणितिला भाजपकडून अनेकदा ऑफर आल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी गावागावात जाऊन भाजपमध्ये जाणार नाही असा खुलासा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed