सांगली: मिरजेत तस्करीसाठी आणण्यात आलेली तब्बल १९ कोटी १७ लाख २० हजार रुपयांची १९ किलो १७२ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी मिरज शहर पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी मंगेश माधव, संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर आणि वैभव भालचंद्र खोबरेकर या तिघांना अटक करण्यात आली आहे.
मालवण येथून कोट्यवधी रुपयांच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु तस्करांकडून यावेळी व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीसाठी मिरजेचा वापर करणार असल्याची माहिती मिळाली होती. सर्व संशयित एका कारमधून मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील वांडरे कॉर्नरजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मिरजेत सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार कार मिरजेत आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली.

तिघांकडून १९ कोटी १७ लाख २० हजार रुपयांची व्हेल माशाची उलटी आणि त्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली ६ लाख ८० हजार रुपयांची कार असा एकूण १९ कोटी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तिघांकडून या व्हेल माशाची उलटी कोणास विकली जाणार होती, या तस्करीसाठी मिरजेचा वापर कशासाठी करण्यात आला, त्याची कर्नाटकात तस्करी होणार होती का? या तस्करीशी मिरजेतील कोणाचा संबंध आहे का? या सर्व बाबींचा तपास सध्या मिरज शहर पोलीस करत आहेत.