• Mon. Nov 25th, 2024
    सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे… मराठा बाधंवांच्या घोषणा, नेत्यांना घरबंदी

    परभणी: सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे अशा घोषणा देत लिमला तालुका पूर्णा येथील मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी अशा आशयाचे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी परिसरामधील ३०-३५ गावातील तरुणांना पोस्टर्स वाटप करण्यात आले. आता हे पोस्टर्स गाव गावाच्या दरवाजावर प्रथम दर्शी भागावर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे एकीकडे लोकसभेचा निवडणूक प्रचार सुरू होत असतानाच दुसरीकडे मात्र मराठा बांधव गावोगावी या नेत्यांची नाकाबंदी करताना दिसत आहे.
    नवे मित्र मिळाल्यानंतर आता जुने मित्र विसरू नयेत, जागावाटपावरून रामदास आठवलेंचा भाजपला घरचा आहेर
    मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, सगेसोयरेचा अध्यादेश तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी मागील काही महिन्यांपासून मराठा समाज आक्रमक आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली. गावात पुढारी आला की त्या पुढार्‍यांच्या गाड्या अडवून अगोदर मराठा आरक्षणाचा निकाल लावा आणि त्यानंतरच गावामध्ये प्रवेश करा, अशा सूचना करत घोषणाबाजी गावकरी करत होते. पुढाऱ्यांना गावबंदी केल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका ग्रामीण भागात बसला. ग्रामीण भागात राजकीय पक्ष आणि नेत्यांना मागील काही महिन्यांपासून कसल्याही प्रकारच्या मोठ्या राजकीय सभा घेता आल्या नाहीत तर विकास कामांचे भूमिपूजन अथवा उद्घाटनही करता आले नाही.आचारसंहिता लागण्याअगोदर राज्य सरकार सगेसोयरेचा अध्यादेश लागू करेल, अशी मराठा समाजाची भावना होती. पण आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेच्या आधी दोन दिवस मोठ्या प्रमाणावर शासन निर्णय निघाले पण त्यामध्ये सगेसोयरेचा शासन निर्णय निघालाच नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागात मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरागे पाटलांवर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. त्यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी देखील राज्य सरकारने लावली आहे. या दोन्ही घडलेल्या घटनांमुळे मराठा समाज प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे.

    पोराला घर सांभाळायला दिलं त्याने बापालाच घराबाहेर काढलं, श्रीनिवास पवारांनी अजितदादांचं सगळंच काढलं

    त्याचाच एक भाग म्हणून मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आता नेत्यांना घरबंदी करण्यास सुरुवात केली आहे. घरबंदीचे पोस्टर देखील छापण्यात आले असून प्रत्येक घराच्या दारावर हे पोस्टर लावण्यात येत आहेत. जसा जसा लोकसभेचा प्रचार जोरात सुरू होत आहे, तसं तसं ग्रामीण भागामध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांना मात्र तोही बाजूने घेण्याचा मराठा समाजाकडून प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या काळात मराठा समाज आणि राजकीय पुढारी यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष होणार असल्याचे हातात स्पष्ट दिसून येत आहे. प्रचाराच्या निमित्ताने सर्वच पक्षांना आणि त्यांच्या पुढार्‍यांना ग्रामीण भागात जावे लागणार आहे. तर मराठा समाज ही आरक्षणासाठी तेवढाच आक्रमक राहणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed