• Sat. Sep 21st, 2024
आधी भाजपला सुनावलं, नंतर कॉंग्रेसवर थेट भाष्य, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

सांगली: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधून शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्यात. दोन जागा निवडून आल्यास रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला मान्यता मिळेल. या जागा मिळण्यासाठी आमचा आग्रह असून यासाठी देवेंद्र फडणवीस देखील प्रयत्न करत आहेत. परंतु महायुतीमधून दोन जागा न मिळाल्यास आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. भाजपला आता काही नवे मित्र मिळाले आहेत. त्यामुळे भाजपाने जुने मित्र विसरू नयेत, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
गिरीश महाजन सुरुची पॅलेसमध्ये, उदयनराजेंसोबत बंद दाराआड चर्चा, म्हणाले – महाराजांना तिकीट मागायची गरज नाही
रामदास आठवले पुढे म्हणाले की, जनतेचा पाठिंबा कसा मिळवायचा हे राहुल गांधी यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी यांना जास्त माहिती आहे. सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना यापूर्वीच पंतप्रधान बनवायला हवं होतं. आता लवकर काँग्रेसला सत्ता मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान होतील असे वाटत नाही. मुंबईत भारत जोडो यात्रेचा समारोप झाला. परंतु काँग्रेसचा खरा समारोप चार जून रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची एकही जागा निवडून येईल, असे वाटत नाही. तसेच जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे. तोपर्यंत महायुती सत्तेत राहील. जनतेचा पाठिंबा नसल्यास आम्ही विरोधामध्ये देखील काम करू.

पोराला घर सांभाळायला दिलं त्याने बापालाच घराबाहेर काढलं, श्रीनिवास पवारांनी अजितदादांचं सगळंच काढलं

भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे हे वारंवार दलित विरोधी भूमिका मांडत आहेत. त्यांच्या विधानाचा आणि भाजपचा काही संबंध नाही. देशाचे संविधान बदलायचा कोणाला अधिकार नाही. आणि ज्यांना संविधान बदलायचे आहे त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. हेगडे यांच्यावर कारवाई करण्याची भाजपकडे मागणी करणार असल्याचेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed