• Mon. Nov 25th, 2024

    पीएमसी बँक कर्जप्रकरणी ४३ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

    पीएमसी बँक कर्जप्रकरणी ४३ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) कर्ज फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हैदराबादमधील किंग कोटी रोडवरील हॉटेल वन कॉन्टिनेंटच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील ४३ कोटी ८४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूकप्रकरणी जॉय थॉमस, वरयम सिंग, राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडून सुरू आहे. मेसर्स हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड (एचडीआयएल), तिचे प्रवर्तक आणि इतर साथीदारांनी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेविरुद्ध ६११७ कोटी ९३ लाख रुपयांची (मुद्दल २५४० कोटी ९२ लाख रुपये आणि व्याजापोटीचे ३५७७ कोटी ०१ लाख) फसवणूक केली असल्याचे ‘ईडी’च्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

    ‘एचडीआयएल’ समूहाच्या बँक खात्यांच्या छाननीदरम्यान २००६ ते २०१४ या कालावधीत ‘एचडीआयएल’च्या प्रवर्तकांनी हैदराबादमधील संस्थांसोबत ४३ कोटी ८४ लाख रुपयांचा व्यवहार केला होता. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *