• Sat. Sep 21st, 2024

सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला

सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला

मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यात २० उमेदवारांची यादी जाहीर केली. पण अन्य मित्रपक्षांकडून अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेतृत्त्वानं महायुतीतील मित्रपक्षांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

महायुतीमधील जागावाटपाचं काम ८० टक्के पूर्ण झाल्याची माहिती गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महायुतीत जवळपास १० जागांवर पेच असल्याची चर्चा आहे. या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून महायुतीमधील पक्षांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जाऊन भाजप नेतृत्त्वाशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काही घडणार नाही.
विधानसभेला दोनदा पराभव, तरीही ठाकरेंकडून संधी, आमदारकी दिली; तोच नेता शिंदे गटात जाणार?
पुढच्या काही तासांत भाजपचं नेतृत्त्व महायुतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधेल. यानंतर पुढील २४ तासांत उर्वरित २८ जागांचं वाटप जाहीर होईल. जागावाटप जाहीर करण्याचे स्पष्ट आदेश भाजप नेतृत्त्वाकडून देण्यात आले आहेत. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. यातील पहिल्या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असेल. त्यामुळे हाती असलेला वेळ कमी आहे. जागावाटप जाहीर करण्यास अधिक वेळ लावू नका, अशा स्पष्ट सूचना भाजप नेतृत्त्वानं दिल्या आहेत.
अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
महायुतीचं संभाव्य जागावाटप कसं असेल?
महायुतीतला सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप ३० जागा लढण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला ११, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ७ जागा सुटू शकतात. शिंदेंसोबत १३ खासदार असताना त्यांना ११ जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांना २ खासदारांची तिकिटं कापावी लागू शकतात. दुसरीकडे लोकसभेचा केवळ एक खासदार असताना अजित पवार ७ जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed