• Mon. Nov 25th, 2024
    नांदेडकरांसाठी खुशखबर, ३१ मार्चपासून ‘स्टार एअर’ची सेवा; प्रवाशांमध्ये आनंद

    म. टा. प्रतिनिधी, नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या नांदेडकरांना दिलासा मिळाला असून येत्या ३१ मार्चपासून पाच शहरांसाठी स्टार एअरची विमानसेवा सुरू होणार आहे. या सेवेबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला असून, पर्यटकांची मोठी सोय होणार आहे.सन २००८मध्ये झालेल्या गुरू-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने नांदेडच्या विमानतळाचा कायापालट झाला होता. दिवसा; तसेच रात्री येथे विमानाची ये-जा होईल, अशी व्यवस्था केली होती. सुरुवातीच्या काळात हैदराबाद, मुंबई, अमृतसर, दिल्ली यांसारखी शहरे विमानसेवेने जोडली गेली होती. नांदेड विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडे देण्यात आले होते; परंतु त्यांचे नियोजन कोलमडल्याने काही दिवसांतच मोठ्या थाटामाटात सुरू झालेली विमानसेवा बंद पडली होती. नांदेडला देशाच्या वेगवेगळ्या भागांतून शीख बांधव दर्शनासाठी येतात. रेल्वेशिवाय त्यांच्याकडे अन्य पर्याय नसल्यामुळे विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती.

    खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विमानसेवा सुरू करण्याबाबत वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही विमानसेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आता २३ मार्चपासून नांदेड-पुणे विमानसेवा उपलब्ध होणार आहे. शिवाय ३१ मार्चपासून दिल्ली, जालंधर, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद अशा पाच शहरांना विमानसेवा मिळणार आहे. त्यांपैकी दिल्ली, जालंदर व बेंगळुरू या शहरांसाठी दररोज विमानसेवा असणार आहे.

    समृद्धीवर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांनो सावधान! असे आहे कारवाईचे स्वरूप…

    अशा असतील विमानसेवा

    – हैदराबाद-नांदेड ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, बुधवार आणि रविवार असणार आहे. सकाळी सात वाजून ५५ मिनिटांनी हैदराबाद येथून विमान उडेल आणि ते आठ वाजून ४५ मिनिटांनी नांदेडला पोहोचले. हे विमान दुपारी साडेचार वाजता नांदेडहून उड्डाण करेल आणि पाच वाजून २० मिनिटांनी हैदराबादला पोहोचेल.

    – नांदेडहून अहमदाबादला निघणारे विमान सकाळी नऊ वाजून १० मिनिटांनी निघून सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल.

    – बेंगळुरूला सकाळी सात वाजून १५ मिनिटांनी निघणारे विमान आठ वाजून ३५ मिनिटांनी नांदेडला पोहोचणार आहे. नांदेडहून दिल्लीला सकाळी नऊ वाजता निघणारे विमान ११ वाजता पोहोचेल. हेच विमान पुढे १२ वाजून २५ मिनिटांनी

    तिकीट विक्रीला सुरुवात

    जाहीर करण्यात आलेल्या सर्व मार्गांवरील तिकिट विक्री सुरू करण्यात आली आहे. या विमानसेवांमुळे नांदेडची मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी चांगली होणार असून नांदेडकरांना; तसेच भाविकांना रेल्वे किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तीन वर्षांनंतर सुरू झालेल्या या विमानसेवेमुळे नांदेडकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed