• Mon. Nov 25th, 2024

    मुलं-बाळ होत नाही म्हणत विवाहितेचा छळ, सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस, अखेर तरुणीनं…

    मुलं-बाळ होत नाही म्हणत विवाहितेचा छळ, सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस, अखेर तरुणीनं…

    धनाजी चव्हाण
    परभणी
    : मुलीचे लग्नाचे वय झाले नसल्याचे माहित असून देखील सासरच्या आणि माहेरच्यांनी तिचे लग्न लावले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तुला मुलं-बाळ होत नाही, असे म्हणत शारीरिक मानसिक छळ केला. पिडित अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवत अत्याचार करण्यात आला. ही घटना सन २०१९ ते सन २०२४ या दरम्यान पिडितेच्या सासरी आणि माहेरी घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
    कोकणात उमेदवाराबाबत महायुतीचा पेच सुटेना, तटकरेंचं नाव चर्चत, धैर्यशील पाटलांचा भावी खासदार उल्लेखानं संभ्रम
    मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय पिडितेने या बाबत सोनपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. सन २०१९ मध्ये तिचे लग्न लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात असलेल्या एका गावातील युवकासोबत लावण्यात आले. त्यावेळी पिडिता अल्पवयीन होती. अल्पवयीन असताना देखील तिचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी चांगले नांदविल्यावर तुला मुलं-बाळ होत नाही, असे म्हणत शारीरिक मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. पिडित अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला.

    राज ठाकरे एक कडव्या कार्यकर्त्याला मुकले, पक्ष नव्हे आम्ही तात्यांसोबत; वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांची भूमिका

    पीडित विवाहित मुलीने घडलेला संबंध प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. पिडिताच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न केला. पण गोष्ट हाताबाहेर गेली आणि सासरच्या मंडळींनी विवाहित अल्पवयीन मुलीला घराबाहेर काढून दिले. त्यानंतर पीडिता आपल्या माहेरी वडिलांकडे आली. त्यानंतर पिडितेच्या तक्रारीवरुन एकूण सहा जणांवर सोनपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed