• Sat. Sep 21st, 2024
त्यावेळी मी २६ वर्षांचा होतो; हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले- शरद पवार

बारामती : मला वयाच्या २६ व्या वर्षी निवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्याविरोधात एका साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र त्यावेळी हा तरुण मुलगा कारखान्याच्या चेअरमनला कसा टक्कर देईल.पण मी सभेत चक्कर टाकल्यानंतर माझी निवडणूक ही माझी राहिलीच नाही. संपूर्ण निवडणूक तरुण पिढीने हातात घेतली. सायकलवर माझा प्रचार केला.समाजातील लहान घटकाने ही निवडणूक हातात घेतली आणि सत्तर हजार मतांनी मला निवडून दिले, असे म्हणत शरद पवारांनी पहिल्या निवडणुकीची आठवण सांगितली.

बारामती दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी भेट दौरे सुरू केले आहेत. त्यात आज बारामतीत असताना त्यांनी कार्यालयाला भेट दिली व ही आठवण सांगितली आहे.

यावेळी पवार म्हणाले की, आतापर्यंत जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत बारामती आणि महाराष्ट्राने मला मागे पाहायला लावलेले नाही. प्रत्येक निवडणुकीत मला सहकार्य केले. मी कधी प्रचाराला येत नसे. तुमच्यापैकी काहीना आठवत असेल माझी शेवटची सभा मिशन हायस्कूल जवळ झाली होती.यातून मला महाराष्ट्राचे शासन, समाजकारण चालवण्याची संधी मला मिळाली. यातून मला राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद, देशांचे संरक्षण मंत्री पद, दहा वर्ष कृषी मंत्री पद असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मला मिळाली. हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

आताच्या ज्या तुमच्या खासदार आहेत. त्या देशातील ५१८ खासदरापैकी त्यांचा पहिल्या तीन मध्ये क्रमांक आहे. शिवाय संसदेत ९८ टक्के हजेरी आहे. त्यामुळे अशा खासदाराला तुम्हाला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे, आणि मला विश्वास आहे ती संधी तुम्ही पुन्हा एकदा द्याल, असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed