मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बार्टी’ या संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्यातील अनुसूचित जाती घटकातील लोकांचा शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिक विकास करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने बार्टी ही संस्था सुरू करण्यात आली असून या संस्थेच्या माध्यमातून मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहे. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रम काय आहेत, तसेच या घटकातील नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी काय करणे आवश्यक आहे. याबाबत महासंचालक श्री. वारे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. वारे यांची मुलाखत मंगळवार दि. 12, बुधवार दि.13 आणि गुरुवार दि. 14 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 14 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
0000