• Sat. Sep 21st, 2024

शिवसेना भाजपकडून हायजॅक? ४ उमेदवार बदलण्याची मागणी, शिंदेंकडे दिली यादी; भाई काय करणार?

शिवसेना भाजपकडून हायजॅक? ४ उमेदवार बदलण्याची मागणी, शिंदेंकडे दिली यादी; भाई काय करणार?

मुंबई: जागावाटपाचा पेच कायम असताना, भाजपकडून अतिशय कमी जागा दिल्या जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या कोंडीत सापडले आहेत. लोकसभेच्या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्त्वाकडून शिंदेंकडे करण्यात आली आहे. याबद्दल एकनाथ शिंदेंचं मत प्रतिकूल असल्याचं समजतं. पण भाजपकडून शिवसेनेवर दबाव वाढला आहे.

ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी भाजपनं एकनाथ शिंदेंना उमेदवारांची नावं सुचवली आहेत. ठाण्यातून संजीव नाईक, नाशिकमधून शांतीगिरी महाराज, कोल्हापूरातून समरजीत घाटगे किंवा धनंजय महाडिक आणि हातकणंगलेतून विनय कोरेंना उमेदवारी द्या, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपच्या मागणीबद्दल शिंदे फारसे अनुकूल नसल्याचं कळतं.
महाशक्ती पाठिशी, डबल गेम होण्याची भीती; बॅकफूटवर गेलेल्या शिंदे, अजितदादांची चिंता वाढली
हेमंत गोडसे नाशिकचे, संजय मंडलिक कोल्हापूरचे, धैर्यशील माने हातकणंगलेचे खासदार आहेत. तिन्ही खासदार शिंदेंसोबत आहेत. पण भाजपनं सर्वेक्षणांचा हवाला देत या जागा निवडून येणं अवघड असल्याची माहिती शिंदेंना दिली आहे. या मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजपनं केली. भाजपने शिंदेंना पर्यायही दिले आहेत. पण त्यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं, असा प्रश्न शिंदेंसमोर उभा राहू शकतो.
भाजप, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा ‘गेम’? शिंदे विचित्र कोंडीत; आतून, बाहेरुन दबाव प्रचंड वाढला
राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत. पक्षफुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत कायम आहेत. त्यांच्या विरोधात रविंद्र फाटक, नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचा विचार शिंदेंकडून सुरू आहे. पण या दोन्ही उमेदवारांचा विचारेंसमोर निभाव लागण्याची शक्यता कमी असल्याचं भाजपनं शिंदेंना सांगितलं आहे. या मतदारसंघातून संजीव नाईक यांना उमेदवारी द्या, अशी भाजपची मागणी आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाण्यासह नवी मुंबईतील काही भागांचा समावेश होतो. ठाण्यात शिंदेंसह भाजपचं प्राबल्य आहे. नवी मुंबईत नाईक कुटुंबाचा दबदबा आहे. त्यामुळे संजीव नाईक यांना उमेदवारी दिल्यास महायुतीतील सर्व पक्ष मिळून त्यांना निवडून आणू शकतो, असं भाजपचं गणित आहे. संजीव नाईक हे भाजपचे नेते आहेत.
लोकसभेत भाजप सुसाट, शिंदेंची जबरदस्त पिछेहाट; सर्वाधिक नुकसान होणार, सर्व्हेतून आकडे समोर
नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची शक्यता अधिक असल्याचा भाजपचं सर्वेक्षण सांगतं. इथून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता वाढते, असं भाजपकडून शिंदेंना सांगण्यात आलं आहे. मध्यंतरी पंतप्रधान मोदींनी नाशिकचा दौरा केला. काळाराम मंदिराला भेट दिली. त्याचा दाखला देत भाजपनं या मतदारसंघातून हिंदुत्त्ववादी चेहऱ्याचा आग्रह धरला आहे. शांतीगिरी महाराजांचा लाखोंचा भक्त समुदाय आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता अधिक असेल, असा भाजपचा होरा आहे.
भाजप पुन्हा ‘त्यागा’च्या तयारीत; महाशक्तीकडून शिंदेंना मोलाचं आश्वासन? जागावाटप मार्गी?
कोल्हापुरातून समरजीत घाटगे किंवा धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपनं शिंदेंकडे केली आहे. दोघेही भाजपचे नेते आहेत. हातकणंगले लोकसभेसाठी भाजपनं विनय कोरेंच्या नावाचा आग्रह धरला. विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक असून ते विधानसभेचे आमदार आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार शिंदेंसोबत आहेत. भाजपच्या मागणीप्रमाणे उमेदवाऱ्या दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं, असा प्रश्न शिंदेंसमोर असेल. त्यामुळे शिंदे भाजपच्या मागण्यांबद्दल फारसे अनुकूल नसल्याचं कळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed