Nashik Crime News : प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मयत डॉ.मनिषा निलेश जेजुरकर या गंगापूर रोडवरील ‘रेवती ब्ल्यु अपार्टमेंट’, डी. के. नगर येथे वास्तव्यास होत्या. काल शुक्रवारी रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच त्यांना बेशुद्ध अवस्थेत दुपारी 2:40 वाजता उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील डॉ. श्रावणे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून गंगापूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
IT Officer Prajwal Pol : बापाच्या घामाचं चीज झालं! UPSC परीक्षेत शेतकरी पुत्राचा डंका, छ.संभाजीनगरमधील प्रज्वलची मोठी झेप
25 वर्षीय आकांक्षाने जीवन संपवलं
नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी हडको परिसरात ही घटना घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असं या तरुणीचं नाव आहे. “वसतीगृहाची फीस थकल्याने वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली,” असा आरोप पीडित कुटुंबीयाने केला. त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Sindhudurg Crime : आईचा मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार, 22 वर्षीय आर्यनचं टोकाचं पाऊल; वाढदिवशीच लेकरू माऊलीला सोडून गेलं!
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होती. आई वडील वीट भट्टीवर मजुरीचे काम करतात. महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या इमारतीत त्यांनी कॉट बेसिसवर सुरू केलेले वसतीगृह आहे. मागील दोन वर्षांपासून आकांक्षा ही कॉट बेसिसवर राहत होती. काल शुक्रवारी दुपारी ती वस्तीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
