• Sat. Sep 21st, 2024
कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांच्या नावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू – एकनाथ शिंदे

कोल्हापूर: छत्रपती राजाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरणासह लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झालेले आहे. या विमानतळाचे संस्थापक छत्रपती राजाराम महाराजांचे नाव विमानतळास देण्यासाठी आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांना दिली.
ईडीने कारखाना जप्त केल्यानंतर रोहित पवार प्रचंड आक्रमक, म्हणाले-सरकारमधील नेत्यांच्या ८ ते ९ फाईल माझ्याकडे
कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राच्या वतीने विमानतळाच्या लोकार्पणानिमित्त त्यांना धन्यवाद देऊन त्यांचा सत्कार केला. या विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन सर्व स्तरावर हा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ होण्यासाठी आपण पंतप्रधानांच्याकडे शिफारस करावी अशी मागणी ललित गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण पंतप्रधानांच्याकडे याविषयी पाठपुरावा करू. तसेच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करून घेऊ असे आश्वासन दिले.

तुम्ही माझी लोकसभेत काळजी घ्या, भर सभेत ज्येष्ठ नेत्यांची नावं घेत पंकजा मुंडेंची साद

ललित गांधी यांनी याप्रसंगी राज्यातील विविध विमानतळांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे दिलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे केली. याप्रसंगी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश यड्रावकर, विज्ञान मुंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed