• Sat. Sep 21st, 2024

कॉलेजच्या नावानं खोटा यूपीआय आयडी बनवला, वर्षभरात विद्यार्थ्यांचे १३ लाख जमवत कॅशिअर फरार

कॉलेजच्या नावानं खोटा यूपीआय आयडी बनवला, वर्षभरात विद्यार्थ्यांचे १३ लाख जमवत कॅशिअर फरार

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा टी पॉइंटजवळील शतायू कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीजमधील आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला आहे. या महाविद्यालयातील कॅशिअर गुलशन वर्मा (वय २१, रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, नरेंद्रनगर) याने कॉलेजच्या नावाने खोटे यूपीआय आयडी बनविले. त्यावर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेशापोटी भरलेले १२ लाख ९८ हजार ५०० रुपये घेऊन तो फरार झाला.
MBA CET परीक्षा एक दिवस पुढे ढकलली, कोणत्या तारखेला होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर
सुमूख नितेश मिश्रा (वय ४६, रा. अमृत स्मृती बंगलो, बलराज मार्ग, धंतोली) हे शतायू कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीज या महाविद्यालयाचे संचालक आहेत. २००८मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयात एमबीए, एमसीए, मास्टर ऑफ सायन्स, एमकॉम, एमए हे पदव्युत्तर तसेच बीबीए, बीसीए, बीकॉम आणि बीए हे पदवी अभ्यासक्रम आहेत. येथे आरोपी गुलशन वर्मा गेल्या आठ वर्षांपासून अकाउंटंट कम कॅशिअर म्हणून कार्यरत होता. त्याने कॉलेजच्या नावाने खोटे यूपीआय आयडी बनविले. त्या आयडीवर १० जानेवारी २०२३ ते ९ मार्च २०२४ यादरम्यान विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेशापोटी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले. ही रक्कम १२ लाख ९८ हजार ५०० रुपये इतकी आहे.
महाविद्यालयांना मान्यता घेणे बंधनकारक; ‘बीबीए’, ‘बीएमएस’, ‘बीसीए’बाबत ‘एआयसीटीई’ची सूचना
गुलशनने खोट्या यूपीआय आयडीवर जमा झालेली संपूर्ण रक्कम स्वत:च्या फोन पे अकाउंटवर वळती केली आणि फरार झाला. ही बाब लक्षात येताच महाविद्यालयाचे संचालक सुमुख मिश्रा यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed