• Sat. Sep 21st, 2024

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दावा, ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दावा, ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच

ठाणे: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातील जागा वाटपावरुन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपने आपला दावा केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचा उमेदवार देण्याकरता शिवसेना नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. भाजपकडून गणेश नाईक यांच्या नावाची चाचपणी येथून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचे नाव पुढे केले जात आहे.

ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. तर, ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बेलापूर, ऐरोली, ठाणे शहर या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार असून कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवड्यात शिवसेनेचे आमदार आहेत. मिरा-भाईंदरमध्ये गीता जैन या अपक्ष आमदार आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव मोठा असल्याने या मतदारसंघावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ठाणे भाजपकडे गेल्यास मुख्यमंत्र्यांसाठी तो मोठा धक्का ठरु शकेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो आपल्याकडे रहावा यासाठी मुख्यमंत्री स्वत: आग्रही असून यावरुन दोन्हीकडून दबावतंत्राचा वापर सुरु असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी कोण उमेदवार असावा याची चाचपणी भाजपकडून केली जात असून ठाण्याचे आमदार संजय केळकर, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे आणि आमदार गणेश नाईक या तीन नावावर पक्षात आढावा घेण्यात आल्याचे समजते. ठाणे जिल्ह्यात आगरी, कोळी, कुणबी हा वर्ग मोठ्या प्रमाणात असून भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांना न्यान देण्यासाठी सर्वं पक्षांकडून आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकीत आगरी, कोळी, कुणबी नेत्यांना उमेदवार आतापर्यंत देत आले आहेत. नवीमुंबई विमान तळला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत.

नामांतरासाठी गेल्यावर्षी मोठे आंदोलनही आगरी, कोळी, कुणबी समाजाकडून गेले होते. भाजपच्या वरिष्ठ यांच्याकडून याची दखल सुद्धा घेतली गेली. आगरी, कोळी, कुणबी, शेतकरी आणि भूमिपुत्र वर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी आणि ओबीसी चेहरा म्हणून माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. दरम्यान, ठाणे भाजपकडे गेल्यास मुख्यमंत्र्यांसाठी तो मोठा धक्का ठरु शकेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो आपल्याकडे रहावा यासाठी मुख्यमंत्री स्वत: आग्रही असून यावरुन दोन्हीकडून दबावतंत्राचा वापर सुरु असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदे हे रवींद्र फाटक यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहॆ.

ठाणे लोकसभेतील विधानसभा आणि आमदार खालील प्रमाणे

बेलापूर – आमदार मंदा मात्रे (भाजप)
ऐरोली – आमदार गणेश नाईक (भाजप)
ठाणे शहर – आमदार संजय केळकर (भाजप)
कोपरी-पाचपाखाडी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना)
ओवळा माजीवाडा – आमदार प्रताप सरनाईक (शिवसेना) मीरा-भाईंदर – आमदार गीता जैन (अपक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed