खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेसाठी उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाहीये. भाजपाच्या उमेदवाराबाबत चाचपणी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांची अनेक नाव पुढे आली आहेत. दरम्यान, मोहळविरुद्ध बॅनर पुणे महानगरपालिकेत झळकल्यामुळे मोहळ मुळीक वाद पेटला होता. आधी नगरसेवक नंतर स्थायी सदस्य त्यानंतर महापौर आणि खासदारकी, बास आता तुला खूप काही दिलं, आता तुला पाडणारच अशा प्रकारचे बॅनर पुणे महानगरपालिकेमध्ये लागल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत तणावाचं वातावरण निर्माण झाला होतं. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात स्वत: लक्ष घातलं का, असा प्रश्न आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर सुप्रिया सुळे, अजित पवार, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा फोन आला आणि ते कोपऱ्यात जाऊन फोनवर बोलले. महाराष्ट्रामधील उमेदवारांची यादी दोन दिवसातच जाहीर होण्याची शक्यता असताना अशा प्रकारचा फोन येण्याने कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये त्यावेळी होत होती. मात्र, फोन कोणाचा आला होता हे येत्या काळात स्पष्ट होईल.