• Mon. Nov 25th, 2024
    सकल मराठा समाजाची बैठक; लोकसभेसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार

    धनाजी चव्हाण
    परभणी: मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्यात सगेसोयरे अधिसुचनेचे रुपांतर अध्यादेशात करावे, यासाठी आता मराठा समाज आंदोलनाचा एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीत हजारो उमेदवार उभे करून ईव्हीएम मशीनच कोमात घालून निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत, या निर्यावर ठाम झाला आहे. शनिवार ९ मार्च रोजी पाथरी शहरातील शिक्षक कॉलनीतील जागृत हनुमान मंदिरात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. यात पाथरी तालुक्याच्या प्रत्येक गावातून दोन ते तीन उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे करून जास्तीत जास्त चारशे उमेदवारी अर्ज परभणी लोकसभा मतदारसंघात दाखल करणार असल्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.मराठा आरक्षण आंदोलनात यापुर्वी ही पाथरी तालुक्याचे योगदान मोठे राहिले आहे. मागील सहा महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत कुणबी म्हणून आरक्षण द्या म्हणून आंदोलन करत आहेत. यात ६३ हजार कुणबी नोंदी सापडल्या देखील. मात्र यात सगेसोयरेची शासनाने अधिसुचना काढली आहे. या अधिसुचनेवर आता अध्यादेश काढून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी करत आहेत. त्यावर शासन उलटा डाव टाकत पाटलांवर एसआयटी लावत विविध गुन्हे दाखल करत आहे. यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून मराठा समाज पहिल्यापेक्षाही जास्त आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. जरांगे पाटलांच्या बैठकांना आता सभेचे स्वरुप येत आहे.
    मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन लोक आणली, ठाकरे गटाच्या नेत्याचा भावना गवळींवर आरोप
    याच आंदोलनाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील चाटेपिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र २ मधील महिला राखीव जागेसाठी पोटनिवडणुक लागली होती. यावेळी या गावातील मराठा समाजाने महिला राखीव असलेल्या या जागेसाठी तब्बल २०३ तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी छाननीनंतर १५५ उमेदवारी अर्ज राहिल्याने आणि एवढ्या मोठ्या संख्येतील उमेवार उभे असल्याने ही निवडणुक घेता येणार नाही असे पत्र निवडणुक आयोगाने जारी केल्याने चाटेपिंपळगावची पोटनिवडणुक रद्द झाली होती. या विषयीच्या बातम्या प्रिंट आणि इलेक्टॉनिक मिडियामधून व्हायरल झाल्या. यानंतर आता हाच फॉर्म्युला मराठा समाज महाराष्ट्रात आणि बाहेर प्रमुख उमेदवारांसमोर वापरुन गमिनीकावा करणार असल्याचे सांगत असून याविषयी बैठका होऊन निर्णय घेत काटेकोर नियोजन करून जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.

    पाथरी शहरातील शिक्षक कॉलनी येथील जागृत हनुमान मंदिरात शनिवारी दुपारी १२ वा सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. त्यात शासनाने सगेसोयरेचा अध्यादेश त्वरीत काढावा, अन्यथा एकाही पुढाऱ्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही. जो पर्यंत सगेसोयरे अद्यादेश पारीत होत नाही तो पर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटायचं नाही. असे निर्णय घेत प्रत्येक गावातून लोकवर्गणी करून दोन ते तीन उमेदवारी अर्ज परभणी लोकसभेला भरणार असल्याचा ठराव ही यावेळी पारित करण्यात आला. या सोबतच मनोज जरांगे पाटील हे १० मार्च रविवार रोजी सायंकाळी सात वाजता मानवत येथे सकल मराठा समाजाची बैठक घेण्यासाठी येत आहेत.

    चोरांच्या सरदाराला तुरुंगांत पाठवायचं आहे, अभिमन्यू पवार पीए होते म्हणे; संजय राऊतांची कडाडून टीका

    या बैठकीला पाथरी शहरासह गावागावातील मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणूक अर्जासाठी लागणारे नियोजन प्रत्येक जि प,पं स गट आणि गणात केले जाणार आहे. लोकसभेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मराठा समाजातील वकील मंडळी संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे यावेळी सागण्यात आले. या बैठकीसाठी मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी उपस्थित होती. शेवटी आरक्षणाच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि राष्ट्रगीताने या सकल मराठा समाजाच्या बैठकीची सांगता करण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *