• Sat. Sep 21st, 2024

आईला संपवण्यासाठी मुलाचा कट, पुरावेही नष्ट, पोलिसांना गुंगारा,मात्र एका चुकीनं अडकला जाळ्यात

आईला संपवण्यासाठी मुलाचा कट, पुरावेही नष्ट, पोलिसांना गुंगारा,मात्र एका चुकीनं अडकला जाळ्यात

लातूर: नात्यामध्ये वितुष्ट निर्माण होऊन हाणामारी अन् खुनाच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील तोंडार पाटी येथे घडली. शेतीसाठी चक्क मुलानेच आईचा निर्घृण खून केला. एवढेच नव्हे तर गुन्हा लपविण्यासाठी बलात्कार करून कोणीतरी खून केल्याचा बनाव केला. पण पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. अखेर पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. संशयित आरोपी मुलाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.खुनाची ही घटना लातूर जिल्ह्यात असणाऱ्या उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी उघडकीस आली होती. सखुबाई तुळशीराम वाघमारे असे ५५ वर्षीय खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा गळा चिरून खून करण्यात आल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खून प्रकरणी आरोपीने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. त्यामुळे खुनातील आरोपींचा शोध लावणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी ८ ते ९ संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.
काही महिन्यांपुर्वीच बदली, अचानक पोलीस निरीक्षकानं गाठला रेल्वे ट्रॅक अन् टोकाचा निर्णय, कारण काय?परंतु या चौकशीत कोणतेही पुरावे किंवा काही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची चौकशी करून त्यांना सोडून दिले. खुनाची घटना समोर आली त्या दिवशी पोलीस पंचनाम्याची कारवाई करत असताना सखुबाई यांचा मुलगा नागनाथ तुळशीराम वाघमारे अस्वस्थ दिसून आला. याशिवाय त्याच्या कपाळावर खरचटल्याची खूण दिसून येत होती. पोलीस निरीक्षक अरविंद पावर यांनी याबद्दल त्याला विचारणाही केली. मात्र पत्नीसोबत शारीरिक सुख भोगताना कपाळावर बांगडी लागल्याने खरचटले असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु ठेवली. पण नागनाथवरही बारीक लक्ष ठेवले होते. तपास सुरु असताना त्यांनी नागनाथच्या पत्नीची चौकशी केली.

पती नागनाथ यांच्याशी शारीरिक जवळकीचा प्रयत्नही गेल्या काही दिवसात झाला नसल्याचे नागनाथच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. यामुळे नागनाथचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवत चौकशी केली असता शेतीच्या वाटणीसाठी आपण आईच्या गळ्यावर कोयत्याने ७० ते ७५ वार केले अन् तिला संपविले. शिवाय पुरावा नष्ट करण्यासाठी आपले रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या खुनाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल राम बनसोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल चेवले, पोलीस नाईक नाना शिंदे यांनी परिश्रम घेतले.

चोरांच्या सरदाराला तुरुंगांत पाठवायचं आहे, अभिमन्यू पवार पीए होते म्हणे; संजय राऊतांची कडाडून टीका

सखुबाई वाघमारे यांनी शेतीची वाटणी करावी, असा तगादा त्यांचा मुलगा नागनाथने लावला होता. शेती विकून त्याला पैसे मिळवायचे होते. पण आई शेतीची वाटणी करेना. शेती विकली तर नातवंडं काय खातील, असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्या वाटणी करण्यास तयार नव्हत्या. पण पोटचा मुलगाच आपल्या जीवावर उठेल, असा विचार त्यांच्या मनाला कधी शिवलाही नसेल. पण मुलाने माणुसकीला काळीमा फासत आईचा सपासप वार करून खून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed