कमी जागा मिळाल्यास शिंदे पवारांची अडचण?
भाजप लोकसभेच्या जागा वाटपात ३२ ते ३५ जागा लढवून मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांना मोजक्या जागा सोडण्याची शक्यता आहे. यावरुन जागा वाटपाची चर्चा अडलेय. अमित शाह यांनी शिंदे आणि पवारांना जिंकू शकणाऱ्या जागा देऊ असं म्हटलं होतं.
भाजपच्या या भूमिकेमुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नेत्यांच्या नाराजीची भीती आणि सोबत आलेल्या काही नेत्यांच्या घरवापसीची भीती वाटत असल्याची चर्चा आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या काही उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या पर्यायाचा विचार समोर आल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या केडरमध्ये अस्वस्थता आहे. आपण आपल्या पक्षाच्या चिन्हावर जिंकू शकत नाही तर भाजपच्या चिन्हावर कसा विजयी होईल अशी चर्चा सेना राष्ट्रवादीच्या संघटनेत आहे.
छोट्या मित्रपक्षांची चर्चाच नाही
महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळं भाजपच्या मित्रपक्ष चर्चेबाहेर आहेत. मागील वेळेप्रमाणं यावेळी देखील महायुतीतील छोट्या मित्रपक्षांना काही हाती न लागण्याची चिन्ह आहेत. रामदास आठवले दोन, नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष एक आणि महादेव जानकर यांच्या रासपनं एक जागा मिळावी, अशी अपेक्षा केलेली आहे.