देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. येत्या १४ मार्च रोजी या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शिंदे-फडणवीस सरकारनेही तयारीचा वेग वाढविला आहे. आचारसंहिता लक्षात घेता राज्य सरकारने गेल्या आठवड्याभरापासून अनेक निर्णयांना मंजुरी देण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे. त्यामुळेच येत्या आठवड्याभरात दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून ११ मार्च आणि १२ मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
या बैठकीपूर्वीच जवळपास सर्वच मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांत कार्यक्रमांचे व विकासकामांच्या शुभारंभाचे आयोजन केले आहे. त्याशिवाय अनेक मतदारसंघात सध्या बैठकांचे सत्र सुरू असून येत्या काळात घेतल्या जाणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाची कशाप्रकारे अंमलबजावणी करायची, याबाबत बैठकीचे आयोजन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.