• Sat. Sep 21st, 2024
‘हरणाऱ्या’ जागा आम्हाला हे धोरण चालायचं नाही, वंचितने महाविकास आघाडीला ठणकावलं

अकोला : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरमरीत पत्र लिहिलंय. महाविकास आघाडी वंचितला चर्चेतून जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलाय. तुमच्यात १५ जागांवर वाद आहेत, तुमचे महत्वाचे नेते भाजपात जात असताना तुमचं वंचितसोबतच्या चर्चेचं धोरण संथ का? असा सवाल वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूरांनी मविआ नेत्यांना केलाय. त्याचवेळी महाविकास आघाडीकडून वंचितला ऑफर केलेल्या दोन जागा या महाविकास आघाडीची ताकद नसलेल्या दिल्या जात आहे. एकीकडे आमची लक्षणीय मते घ्यायची आणि आम्हाला ताकद नसलेल्या जागा द्यायच्या, असे म्हणत मविआच्या जागावाटपाच्या धोरणावर वंचितने बोट दाखवलं आहे. ‘वंचित हा आदर देण्यालायक पक्ष नाही का? असा सवालही ठाकूर यांनी पत्रातून केला आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय ?

वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक (संख्या) आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्याव्यात, महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नकोत, ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची विनंती आहे. आज शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत. आणि कॉग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते भाजप मध्ये गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत. या पार्श्वभूमी वर महाविकास आघाडीने फक्त स्वतःच्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित बहुजन आघाडी कडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे.
वंचितच्या भूमिकेने ‘मविआ’तील जागावाटपाचा तिढा वाढला, वाचा बैठकीत नेमकं काय घडलं?

जिथे मविआची ताकद कमी ती जागा वंचितला, असं मविआचं धोरण दिसतंय

२ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारीच्या बैठकांनंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेतून आम्हाला वगळले गेले. महाविकास आघाडीची ही संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. २०१८ साली झालेल्या पक्ष स्थापनेपासून वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त, गरीब मराठा आणि मुस्लीम समूहांमध्ये वेगाने विस्तार होत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ २ जागा देऊ केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हे मतदारसंघ ज्या जिल्ह्यातील आहेत तेथील आमच्या जिल्हा कार्यकारिणीबरोबर चर्चा केली असता असे जाणवले की, या मतदारसंघात आमचे काम असले, तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे. तसेच, त्यांना या मतदारसंघात जनाधार कमी आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी ही बाब अडचणीची आणि त्रासदायक आहे.
वंचित आणि मविआच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन

तुम्हाला आमची मतं हवीत पण आघाडी नको असं दिसतंय

आम्ही महाविकास आघाडीचा आदरच करतो, पण सातत्याने चर्चेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला आपली मते हवीत पण आपला सन्मान ठेवला जात नाही ही भावना निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीची मते हवीत, परंतु वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नको अशी ही भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
रामटेकमध्ये काय होईल? जळगावमध्ये ठाकरेंचा वाघ रिंगणात, कोल्हापूर काँग्रेसकडे तर सांगली ठाकरेंकडे?

पत्रातून मांडलेले मुद्दे-

‘वंचित बहुजन आघाडी हा आदर देण्याच्या योग्यतेचा पक्ष नाही का?’ हा प्रश्न मी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हा तिघांसमोर मांडत आहे.

आम्ही महाविकास आघाडीचा आदरच करतो, पण सातत्याने चर्चेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिके मुळे महाविकास आघाडीला आपली मते हवीत पण आपला सन्मान ठेवला जात नाही. ही भावना निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीची मते हवीत परंतु वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नको, अशी ही भूमिका आहे.

आपण ठरवून आपापसात चर्चा करावी व ९ फेब्रुवारीच्या बैठकीत तुमची भूमिका मांडावी. आपण बदलाल ही अशा आहे. आपली युती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत. असेही वंचितनं महाविकास आघाडीला दिलेल्या पत्रातून म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed