• Mon. Nov 25th, 2024
    ‘लाख’मोलाची मदत, वृद्ध महिलेकडून पेन्शनचे पैसे साठवून वंचितच्या उमेदवारांसाठी निधी!

    मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तन लढ्यासाठी नागाबाई लोखंडे या वृद्ध महिलेने आपल्या पेन्शनमधील पैसे साठवून एक लाख रुपयांचा निधी आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. वंचित बहुजन आघाडीच्या शिलेदारांसाठी निवडणूक निधी म्हणून त्यांनी हे पैसे आंबेडकरांच्या हाती दिले. नागाबाई लोखंडे यांनी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून पैसे जमवून परिवर्तनाच्या लढ्यासाठी आपण सिंहाचा वाटा उचलत असल्याचे सांगितले.

    वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभर सभा, मेळावे होत आहेत. या सभांना हजारोंचा जनसमुदाय जमतोय. अशावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तसेच उमेदवारांच्या निवडणूक काळातील खर्चासाठी आपालाही वाटा असावा अशा हेतून मी मदत करते आहे, असे नागाबाई लोखंडे यांनी सांगितले.

    आम्ही कुणाचे गुलाम म्हणून मेंढरासारखे जाणार नाही

    बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला आहे. आता आम्ही कुणाचे गुलाम म्हणून मेंढरासारखे जाणार नाही, तर या निवडणुकीत आम्ही सत्ता परिवर्तन घडवणारच, अशा भावना नागाबाई लोखंडे यांनी व्यक्त केल्या. दुसरीकडे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या माऊलीसारख्या हजारो माऊलींना सलाम करत असल्याचं वंचितने म्हटले.

    मी आघाडीसोबत आहे पण आघाडीच माझ्यासोबत नाही

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या बुधवारच्या बैठकीतही कोणताही ठोस निर्णय झाला नाही. या बैठकीत प्रमुख नेते उपस्थित असतानाही तोडगा न निघाल्याने आता जागावाटपाचा पुढील निर्णय ९ मार्चच्या बैठकीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून मी आघाडीसोबत आहे, परंतु मला असे वाटते की आघाडीच माझ्यासोबत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

    वंचित बहुजन आघाडीने २७ जागांचा आढावा मविआला पाठवला होता. मात्र ही वंचितची मागणी नसल्याचे मविआकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकीला येण्याआधी वंचितकडून १५ जागांची मागणी करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात बैठकीत त्यांचा सूर नरमाईचा असल्याचे समजते. त्यामुळे पाच जागांपर्यंत बोलणी आली, मात्र आघाडी ३ जागा देण्यास तयार असल्याचे समजते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *