• Mon. Nov 25th, 2024

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फार्मर टूल किट, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप 

    ByMH LIVE NEWS

    Mar 7, 2024
    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फार्मर टूल किट, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप 

    मुंबई, दि. ७: मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व त्यालाच जोडलेला डेस्क अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे (इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन किट – IEC KIT) वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले.

    वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार भरत गोगावले यांच्यासह आयटीसी कंपनी,  AFARM,  फिनिश सोसायटीचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक मनोज घोडे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने, आयटीसी या कंपनीचे आर्थिक सहाय्य व फिनिश सोसायटी या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने लाभार्थ्यांना या लाभाचे वाटप होत आहे.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये शेती साहित्याबरोबर वैयक्तिक उपयोगाच्याही गोष्टींचा समावेश असल्याने त्याचा या शेतकऱ्यांना  लाभ होणार आहे. तर नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य (आयईसी किट) मुलांना उपलब्ध होणार असल्याने या मुलांची जाण वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

    ०००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *