• Sat. Sep 21st, 2024
८ दिवसांत पुरावे द्या नाहीतर महाराष्ट्रभर शरद पवार खोटे आरोप करतायेत असं सांगेन : सुनील शेळके

मावळ ( पुणे) : शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला वाईट वाटते आहे. साहेबांनी कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यांना ही खोटी माहिती देण्यात आली. मी कोणत्याही कार्यकर्त्याला दमदाटी केलेली नाही. साहेब माझ्याबद्दल असे बोलतील असे मला अपेक्षितच नव्हते, अशी भूमिका मांडताना माझ्यावरील आरोप सिद्ध करा नाहीतर मी महाराष्ट्रात जाऊन सांगेन की शरद पवार यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, असे आव्हान अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिले.

लोणावळा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनील शेळके यांच्या कथित दमदाटीवर बोलताना त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच या रस्त्याला मी जात नाही, पण वेळ आली तर त्याला सोडत नाही, असा इशाराही त्यांनी आमदार शेळके यांना दिला. शरद पवार यांची सभा पार पडल्यानंतर लगोलग आमदार शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं.
“सुनील शेळके, तू आमदार कुणामुळे झालास? तुझ्या अर्जावर माझी सही… मला शरद पवार म्हणतात”

…नाहीतर शरद पवारांनी खोटे आरोप केले असे मी राज्यभर सांगणार

यावेळी सुनील शेळके म्हणाले की, “मी अजित पवार यांच्या सोबत गेलो कारण अजित पवार यांनी मला निधी दिला, माझ्या मागे उभे राहिले, त्यामुळे मी त्यांच्यासोबत का जाऊ नये?” असा प्रश्न शेळके यांनी उपस्थित केला. तसेच “पुढील आठ दिवसात मी दम दिलेला एकतरी व्यक्ती त्यांनी समोर आणावा, पुरावे द्यावेत, नाहीतर शरद पवारांनी खोटे आरोप केले असे मी राज्यभर सांगणार”, असंही शेळके म्हणाले.
साहेब, मी तुमच्यापेक्षा ६ महिन्यांनी मोठा! बाफना बोलले न् शरद पवारांनी हात जोडले; हशा पिकला

काय म्हणाले होते शरद पवार ?

लोणावळा येथील शरद पवार यांच्या मेळाव्याला स्थानिक कार्यकर्त्यांनी जाऊ नये, यासाठी सुनील शेळके यांनी धमकावल्याचा आरोप आहे. यासंदर्भातच बोलताना शरद पवार यांनी शेळके यांचा समाचार घेतला. मी वाकड्या वाटेला जात नाही. मात्र माझ्या वाट्याला कुणी गेलं तर मी सोडत नाही. मी शरद पवार आहे विसरू नको.. तू आमदार कोणामुळे आहे हे लक्षात ठेव, माझ्या वाटेला गेलास तर मी देखील कोणाला सोडणार नाही… अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना इशारा दिला.

तुला आमदार कोणी केलं? लक्षात ठेव, शरद पवार म्हणतात मला; भर सभेत सुनील शेळकेंना इशारा

यावर तातडीने सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त करत शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने माझ्यावर अशी टीका करणे हे अपेक्षित नव्हतं, असे सांगत ज्यांनी खोटी माहिती दिली त्या बद्दल मी साहेबांना भेटून विचारणार असल्याचे शेळके यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed