• Mon. Nov 25th, 2024
    नाशिक ते ईशान्य मुंबई, अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या १३ जागांसाठी इच्छुक

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आठ जागांवर चर्चा झाली. आज, बुधवारी उर्वरित जागांवर चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी पक्ष राज्यात १२ ते १३ जागा लढविण्यासाठी इच्छुक असून जास्तीत जास्त जागांवर पक्षाने निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे करण्यात आली.

    लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारांची पहिली यादी २ मार्च रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नरिमन पॉईंट येथील महिला विकास मंडळ सभागृहात लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते.
    सख्ख्या काकाला सोडून युगेंद्र पवार चुलत आत्या-आजोबांच्या साथीला, बारामतीत भेटीगाठींना वेग
    बैठकीत राज्यातील आठ मतदारसंघांवर चर्चा करण्यात आली. यात भंडारा-गोंदिया, नाशिक, दिंडोरी, ईशान्य मुंबई, धाराशिव, रायगड आणि हिंगोली याची चर्चा करण्यात आली. महायुतीशी वाटाघाटी करून पक्षाच्या पदरात अधिकाधिक जागा पाडून घेण्याची विनंती यावेळी कार्यकर्ते आणि नेत्यांकडून अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष राज्यात १२ ते १३ जागांवर लढण्यास उत्सुक आहे.
    खासदार होऊन दुरावलो, दोन महिन्यात कायमचा शिर्डीत येतो, सुजय विखे लोकसभेतून माघार घेणार?
    बारामती, शिरुर आणि सातारा, गडचिरोली, परभणी या जागांवर बुधवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीविषयी माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, पक्षातर्फे राज्यातील मतदारसंघनिहाय जागांची चाचपणी करण्यात येत असून सर्वच मतदारसंघांत कार्यकर्ते उत्साही आहेत. बारामतीची जागा महायुतीत कुणाकडे जाते, हे पाहावे लागेल, मात्र जर राष्ट्रवादीकडे ही जागा आल्यास त्यावर सुनेत्रा पवार हमखास निवडून येतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबईत असून त्यांच्यासोबत पक्षनेतृत्वाची बैठक झाल्यावर कोणत्या पक्षाकडे किती आणि कोणती जागा येणार हे स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

    निलेश लंके भावी खासदार, कार्यकर्ता ओरडला; अमोल कोल्हेंनी तिथेच ऑफर दिली

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    पक्ष सत्तेत असून जितक्या जास्त महायुतीच्या माध्यमातून मिळवता येतील त्या मिळवून त्यावर उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसायला तयार असल्याचे कार्यकर्ते बैठकीत सांगत होते. तसेच, कांदा निर्यातबंदीचा फटका काही मतदारसंघांत बसू शकतो, असेही काही नेत्यांनी बैठकीत नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed