पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. ‘नो ड्रोन झोन’साठीचा प्रतिबंधक आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी लेखी आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम १८८ आणि व प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यईल. हा आदेश चार मार्चपासून पाच मार्चपर्यंत अमलात राहणार आहे.
प्रतिबंधात्मक आदेश
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, पोलिस उपायुक्त, सर्व सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांनी सदरचा प्रतिबंधात्मक आदेशासाला प्रसारमाध्यमे, सर्व पोलिस ठाणी, पोलिस अधिकारी कार्यालय, छावणी मंडळ, महानगर पालिका, मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठा, सार्वजनिक वाचनालये आदी महत्त्वाच्या ठिकाणच्या सूचना फलकांवर चिटकावून प्रसिद्धी द्यावी. त्याचप्रमाणे पोलिस आधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१चे कलम १६३प्रमाणे प्रसिद्धीची कार्यवाही करावी, असे म्हटले आहे.
शहरामध्ये उद्या वाहतुकीत बदल
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पाच मार्चला सांस्कृतिक क्रीडा मंडळ, खडकेश्वर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी राज्यातल विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेच्या परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाच मार्चला दुपारी दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी दिली.
बंद राहणारे मार्ग :
जुनी मल्टीपर्पज शाळा ते नारळीबाग चौक, आयटीआय ते खडकेश्वर टी पॉइंट, जुबली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे जाणारा रस्ता, गीता झेरॉक्स ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे जाणारा रस्ता, मिल कॉर्नर ते खडकेश्वर मार्गे महात्मा फुले चौकाकडे जाणारा रस्ता. पर्यायी मार्ग : मिलकॉर्नर ते भडकल गेट, मिलकॉर्नर ते वरद गणेश मंदिर मार्गे सावरकर चौक.