• Mon. Nov 25th, 2024

    तेलंगणाला जाण्यासाठी कॅब बुक केली अन् चालकाला पाजली दारू, कार घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना बेड्या

    तेलंगणाला जाण्यासाठी कॅब बुक केली अन् चालकाला पाजली दारू, कार घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना बेड्या

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘तेलंगण येथे जायचे आहे’, असे सांगून दोघांनी कॅब बुक केली. लांबचा प्रवास असल्याचे सांगून कॅबचालकाला घेऊन दोघेही कोतवाली हद्दीतील बारमध्ये गेले. वाहनचालकाला दारू पाजल्यानंतर त्या दोघांनी कार आणि मोबाइल घेऊन पळ काढला. दोन राज्यांत तपास केल्यानंतर अखेर या दोन्ही चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.राहुल शर्मा असे फिर्यादी वाहनचालकाचे नाव आहे. त्यांच्याकडे स्विफ्ट डिझायर ही कार असून, ती ओला कॅबमध्ये आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दोन व्यक्तींनी त्यांची कॅब तेलंगणला जाण्यासाठी बुक केली होती. दरम्यान, कार आणि मोबाइल असा सुमारे ७ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार राहुल यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात २० जानेवारीला केली. पोलिसांनी आरोपींवर कलम ४०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल करून तपासाला सुरुवात केली.

    बारावीचे पेपर संपण्याआधी बापाने लेकीला संपवलं, तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं, कारण काय?
    गुन्हेशाखा युनिट क्रमांक ३ पोलिसांच्या पथकाने शहरातील सीओसी कॅमेरे तपासले. शेजारच्या राज्यांमध्ये तपास सुरू केला. अखेर आंध्र प्रदेशातून कानाकुर्ती पूर्णा चंद्राराव केसवय्या (वय ३७ वर्षे) आणि पुष्परेड्डी कार्तिक वल्द पुष्परेड्डी सारकेश्वर (वय ३० वर्षे) या तेलंगणातील दोघांना ताब्यात घेण्यात आले. राहुल यांना दारू पाजून ही कार व मोबाइल असा ऐवज पळविला, अशी कबुली या दोघांनी दिली. चोरीला गेलेली कार आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

    चोराने नवं अलिशान घर बांधलं, पण टीव्ही नसल्याने थेट चोरी; पोलिसांकडून अटक होताच स्वप्न अपूर्ण!

    ही कारवाई पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक देवकाते, पाहवा, मुकेश राऊत, प्रवीण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जासुद, विनोद गायकवाड, संतोष चौधरी यांनी सायबर सेलच्या मदतीने केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed