• Sat. Sep 21st, 2024

विचार करावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल! आजी-माजी आमदारांनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन

विचार करावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल! आजी-माजी आमदारांनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन

पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात एकूण १९५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. १६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांचा यात समावेश आहे. पण महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश भाजपच्या यादीत नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जागावाटपचा तिढा कायम आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे मतदारसंघातील पेच वाढत चालले आहेत.

गेल्या वेळी निवडून आणलं, आता या निवडणुकीत मीच पाडणार, असं थेट आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना दिलं आहे. कोल्हे यांच्याविरोधात माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील लढण्यास उत्सुक आहेत. मागील निवडणुकीत कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला होता. युतीत ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल असं दिसतंय. त्यामुळे आढळराव घड्याळ हाती घेण्याची चिन्हं आहेत.
भाजपच्या बॅनरवरुन शिंदेसेना गायब, अजित पवारांचा फोटो फळकला; पण CMचा फोटो टाळला
आढळरावांच्या पक्षप्रवेशाला आणि उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. मी २० वर्षे आढळराव पाटलांविरोधात संघर्ष करतोय. आढळरावांना पक्षप्रवेश दिल्यास बाकी आमदार नाराज होतील. मलाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत मोहिते पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आढळरावांना पक्ष प्रवेश दिला तर…; मोहिते पाटील स्पष्टच बोलले, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गुंता आणखी वाढला
माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक आहेत. त्यांचाही आढाळरावांच्या उमेदवारीला विरोध आहे. ‘२०१९ मध्येही मी लोकसभा लढवण्यास उत्सुक होतो. पण निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंना संधी देण्यात आली. अजित पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सांगण्यावरुन कोल्हेंसाठी काम केलं. पण आता पुन्हा आयात उमेदवारालाच संधी दिली जात असेल तर काही गोष्टींचा विचार करावा लागेल,’ असं लांडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed