• Sat. Sep 21st, 2024
भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात धडकणार, राहुल गांधी काळाराम मंदिराला देणार भेट

नाशिक: राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काही दिवसातच महाराष्ट्रात धडकणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करताच नाशिकमधील टप्पा महत्वपूर्ण ठरणार आहे. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाकडून तयारीला वेळ आलेला असताना राहुल गांधी यांना थेट “राजीव गांधी यांच्याप्रमाणे बॉम्बने उडवून देऊ” असा कॉल नाशिक पोलिसांना आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आठ दिवसांपूर्वी आलेल्या कॉलबाबत तपास केल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या सभांचा धडाका; सांगलीतील सभा निर्णायक, वंचितच्या उमेदवाराची घोषणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेचे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आठ दिवसांपूर्वी आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. तो माथेफिरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची माहिती नाशिक पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलीस नजर ठेऊन आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात एक कॉल आला होता. राहुल गांधी यांच्या हत्येचा कट रचला गेला आहे. राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती.या धमकीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक इतर शाखांनी याबाबत शहानिशा केली असता ज्या व्यक्तीने फोन केला होता. तो व्यक्ती नाशिक येथील गंगापूर हद्दीत राहत असून मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यावर आम्ही नजर ठेवून आहोत, असं पोलीस निरीक्षक सुभाष पवार म्हणाले. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पोलिसांनी उघड केली नसली तरी हा व्यक्ती नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तो मागील १० वर्षांपासून दारूच्या आहारी गेला आहे. त्यामुळे त्याची मानसिक परिस्थिती सुदृढ नाही तसेच फोन करतानादेखील तो दारू प्यायला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याबाबतचा संपूर्ण अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

मुख्यमंत्री आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांना बोलवून समज देतील | संजय शिरसाट

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ११ मार्चला महाराष्ट्रात दाखल होणार असून २० मार्चला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. यादरम्यान, राहुल गांधी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून यात्रेला सुरवात करतील पुढे चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यानंतर नाशिक शहरात त्यांच्या रोड-शोचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जानेवारीमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील मनसेच्या वर्धापनदिनी काळाराम मंदिरात हजेरी लावणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी हेदेखील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकच्या पौराणिक महत्व असलेल्या काळाराम मंदिराला देखील एक वेगळे महत्व प्राप्त झाल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed