• Sat. Sep 21st, 2024

पुढील वर्षी RSSचे शताब्दी वर्षात पदार्पण, तब्बल तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन

पुढील वर्षी RSSचे शताब्दी वर्षात पदार्पण, तब्बल तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन

अमरावती: जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी व शिस्तबध्द संघटना म्हणून लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा तब्बल तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात होणार आहे. २०२५ हे संघाचे शताब्दी वर्ष असल्याने या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय व ठराव होण्याची शक्यता आहे.प्राप्त माहिती नुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा दिनांक 15, 16 आणि 17 मार्च 2024 रोजी विदर्भातील नागपूर (महाराष्ट्र) येथील ‘स्मृतिभवन’ परिसर, रेशीमबाग येथे होणार आहे.

या बैठकीत 2023-24 च्या संघाच्या कार्याचा आढावा आणि आगामी वर्षाच्या (2024-25) संघाच्या कार्य आराखड्यावर चर्चा होणार असून यासोबतच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांसह अखिल भारतीय कार्यकारिणी, क्षेत्र आणि प्रांत कार्यकारिणी, संघाचे निवडून आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी, सर्व विभाग प्रचारक तसेच विविध संघटनांचे निमंत्रित कार्यकर्ते सहभागी होतील.

अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळीया बैठीकीत सरसंघचालक, सरकार्यवाह यांच्यासह सर्व अखिल भारतीय कार्यकर्त्यांचा प्रवास, स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी संघ शिक्षा वर्गांच्या नव्या योजनेच्या कार्यान्वयनाबाबत विचार होण्याची शक्यता आहे. संघाच्या शताब्दीनिमित्त शाखा व कार्य विस्तार योजनेच्या बळकटीकरणासोबतच विशेषतः आगामी शताब्दी वर्षाच्या उपक्रमांवर चर्चा, प्रतिनिधी सभेत देशाच्या सद्यस्थितीचा विचार करून, महत्त्वाच्या विषयांवरही प्रस्तावही पारित केले जातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला शंकर महादेवन यांची हजेरी

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दरवर्षी देशाच्या विविध भागात आयोजित केली जाते. दर तिसऱ्या वर्षी तिचे आयोजन नागपुरात केले जाते. या महिन्यात होणाऱ्या या प्रतिनिधी सभेत देशाच्या विविध ४५ प्रांतातील १ हजार ५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले, सुनील आंबेकर यांच्यासह अखिल भारतीय कार्यकारणी उपस्थित राहणार आहे. रेशीमबागेत या प्रतिनिधी सभेसाठी नियोजन व तयारी सुरू असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed