• Mon. Nov 25th, 2024

    नागपूर महापालिकेतील ज्येष्ठ नागरिक कक्ष बंद, समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ हिरावल्याची भावना

    नागपूर महापालिकेतील ज्येष्ठ नागरिक कक्ष बंद, समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ हिरावल्याची भावना

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने महापालिकेच्या मुख्यालयी सुरू करण्यात आलेला ज्येष्ठ नागरिक कक्ष प्रशासकाच्या नियुक्तीपासून बंद पडला आहे. हा कक्ष सुरू करण्यात यावा, यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. परिणामत: समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ हिराविल्याची भावना व्यक्त होत आहे.

    सीनिअर सिटिझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टच्या सहकार्याने नागपूर महापालिकेच्या सिव्हिल लाइन्स येथील मुख्यालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष उभारण्यात आला होता. त्या कक्षाचे उद्घाटन तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी ज्येष्ठांना हक्काची जागा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती. त्या कक्षाला ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. दर मंगळवार आणि गुरुवार असे दोन दिवस हे केंद्र दुपारी १२ ते २ वाजतादरम्यान सुरू असायचे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना दिलासा मिळवून देण्याचे कार्य ज्येष्ठ नागरिक केंद्रामार्फत व्हायचे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी या कक्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेचा एक पदाधिकारी सेवारत असायचा. यासाठी आवश्यक सहकार्य महापौर कार्यालयामार्फत केले जायचे. ‘आझादी-७५’च्या अनुषंगाने शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न नागपूर महापालिकेने केला होता. त्याच शृंखलेत ज्येष्ठ नागरिकांना अंतर्भूत करत त्यांच्यासाठी कक्ष सुरू करण्यात आला होता. परंतु, प्रशासक आल्यानंतर कक्ष अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
    कैरीची आवक जोरात, दरात घट; ठोक बाजारात प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांना होतेय विक्री
    वारंवार केला पत्रव्यवहार

    ज्येष्ठ नागरिक कक्ष सुरू करण्यात यावा, यासंदर्भात विद्यमान प्रशासक डॉ. अभिजित चौधरी तसेच यापूर्वीचे प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्यावर दोन्ही प्रशासकांनी कुठलेही उत्तर दिलेले नाही. तसेच यासंदर्भात कक्ष सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत, असे ज्येष्ठांचे म्हणणे आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed