• Sat. Sep 21st, 2024

उन्हाचे चटके वाढताच विजेची मागणी वाढली, जवळपास ३१०० मेगावॅट टप्पा गाठला, वाचा सविस्तर…

उन्हाचे चटके वाढताच विजेची मागणी वाढली, जवळपास ३१०० मेगावॅट टप्पा गाठला, वाचा सविस्तर…

मुंबई: मागील दोन-तीन दिवसांत ऊन तापू लागल्याने मुंबईच्या वीज मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत २८०० ते २९०० मेगावॅटदरम्यान असलेली विजेची मागणी आता ३१०० मेगावॅटकडे जात आहे. आर्थिक राजधानी मुंबईची वीज मागणी सहसा मार्च महिन्याच्या मध्यानंतर वाढू लागते. त्यावेळी ही मागणी ३२०० ते ३४०० मेगावॅटदरम्यान असते. मात्र आता मागील दोन दिवसांपासून उन्हाचे चटके अधिक जाणवू लागल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईच्या वीजमागणीने जवळपास ३१०० मेगावॅट टप्पा गाठला आहे.
अजित पवारांची मंचरमध्ये सभा, आढळरावांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाची जोरदार चर्चा
मुंबईला भांडुप ते मुलुंडचा परिसर वगळल्यास उर्वरित भागात बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्याकडून वीजपुरवठा होतो. या पुरवठ्यासाठी टाटा पॉवरकडून ४४७ मेगावॅट जलविद्युत, ट्रॉम्बे येथे ७५० मेगावॅट औष्णिक वीज तसेच अदानी इलेक्ट्रिसिटीचा डहाणू येथे ५०० मेगावॅटचे प्रकल्प कार्यरत आहेत. टाटा पॉवर स्वत:च्या साडे सात लाख ग्राहकांकसह बेस्टच्या दहा लाख ग्राहकांना वीज देते. या स्थितीत शुक्रवारी मुंबईची वीजमागणी दुपारी कमाल ३०८३ मेगावॅटवर पोहोचली असताना डहाणूच्या औष्णिक वीज प्रकल्पातून जवळपास ३६० मेगावॅट, तर टाटा पॉवरकडून ट्रॉम्बे व जलविद्युत मिळून जवळपास ८५० मेगावॅटचा वीजपुरवठा करण्यात आला. उर्वरित वीज ही वितरण कंपन्यांनी नूतनीय ऊर्जास्रोतांकडून मिळवली.

मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी, त्यांच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला गरज, मराठा बांधवांचा आग्रह

वीजखरेदीचा भार वाढणार
येत्या काळात ऊन आणखी तापण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईची ही वीज मागणी ३५०० मेगावॅटच्यावर जाण्याची शक्यता असेल. अतिरिक्त वीजखरेदीचा भार न येण्यासाठी वीज वितरण कंपन्या नूतनीय ऊर्जास्रोतांमधून वीजखरेदीला प्राधान्य देत आहेत. मुंबईची कमाल वीज मागणी मागील वर्षी जून महिन्यात ४ हजार मेगावॅटचा टप्पा पार करीत उच्चांक गाठला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed