नेमका प्रश्न काय होता?
दरम्यान कालपासून बारामतीत एक पत्र व्हायरल होत आहे. बारामतीकरांची भूमिका अशा नावाने हे पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात पवारांच्या घराण्याच्या राजकारणाविषयी लिहिलं आहे. तसेच पवार कुटुंबियात फूट का पडली? यासंबंधीचं विवेचन या पत्रातून केलं आहे. यावर पश्न करताना एका पत्रकाराने शरद पवारांना विचारले की, बारामतीत एक बारामतीकर या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. पवार कुटुंबियात फूट पडण्यामागची कारणे त्यात विषद करण्यात आली आहेत. आप्पासाहेब पवार राजकारणात येणार होते, त्यानंतर राजेंद्र पवार येणार होते….. पत्रकाराचा हा प्रश्न पूर्ण होण्याआधीच शरद पवार यांनी नाराजी दर्शवली आणि शांततेत सुरू असलेल्या पत्रकार परिषदेचं रुपांतर काहीशा गंभीर वातावरणात झालं.आतापर्यंत शांतपणे उत्तर देत असलेले शरद पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर काहीसे संतापलेले पाहायला मिळाले. असे फालतू विषय आणि प्रश्न विचारू नका. कुणाचं पत्र याबद्दल काहीही माहिती नाही, कुणी काढलं माहिती नाही. तसेच त्याला अर्थही नाही… त्या प्रश्नाचं उत्तर मी कशाला द्यायचं…? मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी फक्त आजचा लोकसत्ताचा अग्रलेख (अजित पवार यांच्यासंबंधित) वाचला, असं बोलत पवारांनी पत्रकाराला झापले तसेच ‘अग्रलेख वाचला’ हे आवर्जून सांगताना अजित पवारांना अप्रत्यक्ष टोमणाही मारला.
शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
पत्रकार परिषदेत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र डागलं आहे. शरद पवार म्हणाले की, आज जबाबदार लोकच पोरकटपणे बोलत आहेत. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजच्या मुख्यमंत्री पाहिले. पण जबाबदार पदावर बसून पोरकट विधाने करणारी आत्ताची मंडळी आहेत. जरांगेंबद्दल बोलायचं झालं तर मी त्यांच्या उपोषणादरम्यान त्यांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी मी फक्त इतकंच सांगितलं की, तुमच्या मागण्यांसंदर्भातील आग्रह समजू शकतो. पण दोन समाजात अंतर वाढेल, असं काही करु नका. इतर समाजासाठी हे योग्य दिसणार नाही. एवढंच आमचं बोलणं झालं आहे, असं म्हणत शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.